Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा शहरातील अपघात रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलीस निरीक्षकांना निवेदन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नाबालिग वाहनचालक, ट्रिपल सीट व रोड रोमिओगिरीवर कारवाईची मागणी आमचा विदर्भ - वृत्तसेवा राजुरा (दि. १४ जुलै २०२६) -         राजुरा शहरात वाढत्...
नाबालिग वाहनचालक, ट्रिपल सीट व रोड रोमिओगिरीवर कारवाईची मागणी
आमचा विदर्भ - वृत्तसेवा
राजुरा (दि. १४ जुलै २०२६) -
        राजुरा शहरात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजुरा विधानसभा अध्यक्ष अमोल राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक, राजुरा यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

        निवेदनात शहरात नाबालिगांकडून होणारी बेदरकार वाहनचालना, ट्रिपल सीट प्रवास, हेल्मेटचा अभाव, रोड रोमिओगिरी, अवैध पार्किंग तसेच वाहतूक नियमांचे वाढते उल्लंघन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनानुसार, ११ जुलै २०२६ रोजी विशाल केशव जीवतोडे यांचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर समीर राचार्लावर यांचे मोठे बंधू सागर राचार्लावर यांनाही भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर दुखापत होऊन हाताचे फ्रॅक्चर झाले. या सलग घटनांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी स्पष्ट झाल्या असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

        निवेदनाद्वारे नाबालिग वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबविणे, हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी करणे, वाहनचालकांच्या ड्रायव्हिंग लायसन्स व वाहन विम्याची तपासणी करणे, ट्रिपल सीट वाहनचालकांवर कठोर कारवाई करणे, शाळा व महाविद्यालये सुटण्याच्या वेळेत वाहतूक पोलीस व होमगार्ड तैनात करणे, चंद्रपूरच्या धर्तीवर राजुरा शहरातील प्रमुख चौकांमध्ये कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रण व्यवस्था उभारणे, शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गांवर वेगमर्यादेचे फलक लावणे, अवजड वाहनांसाठी स्वतंत्र वेगमर्यादा निश्चित करणे, अवैध पार्किंग हटविणे तसेच रस्त्यांवर अधिकृत पार्किंग मार्किंग करण्याची मागणी करण्यात आली.
        याशिवाय, चहा टपऱ्या, हॉटेल, खानावळ आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांनी ग्राहकांना वाहने योग्य ठिकाणी उभी करण्याबाबत सूचना देण्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली. तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये वाहतूक नियम, रस्ता सुरक्षा आणि जबाबदार वाहनचालना याबाबत नियमित जनजागृती व समुपदेशन कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष जहीर खान, शहराध्यक्ष रकीब शेख, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष सुरेंद्र फूसाटे, सय्यद सिराज, धनराज उमरे तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
        यावेळी सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजुरा विधानसभा अध्यक्ष अमोल राऊत म्हणाले, "अपघात झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा अपघात होणारच नाहीत, अशी प्रभावी वाहतूक व्यवस्था उभी करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारच्या राजकीय अथवा इतर दबावाला बळी न पडता कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे."
        राजुरा शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडूनही व्यक्त केली जात आहे.

#Rajura #RajuraNews #Chandrapur #ChandrapurNews #TrafficSafety #RoadSafety #TrafficRules #HelmetSafety #RoadAccident #NCP #NationalistCongressParty #AmolRaut #MaharashtraNews #VidarbhaNews #BreakingNews #LocalNews #CitizenSafety #OurVidarbha #AmchaVidarbha #NewsUpdate

About Author

Advertisement

Next
This is the most recent post.
Previous
थोडे जुने पोस्ट

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top