Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सर्वसामान्य व कामगार कुटुंबातील मुलांसाठी ‘गुरू ग्लोबल प्ले स्कूल’; आधुनिक शिक्षणाची नवी संधी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
‘नो प्रॉफिट, नो लॉस’ तत्त्वावर प्ले स्कूलची वाटचाल; पालकांना लाभ घेण्याचे आवाहन आमचा विदर्भ वृत्त सेवा राजुरा (दि. ०४ जून २०२६) -         रा...
‘नो प्रॉफिट, नो लॉस’ तत्त्वावर प्ले स्कूलची वाटचाल; पालकांना लाभ घेण्याचे आवाहन
आमचा विदर्भ वृत्त सेवा
राजुरा (दि. ०४ जून २०२६) -
        राजुरा शहरात ‘गुरू ग्लोबल प्ले स्कूल’च्या उद्घाटन, विद्यार्थी प्रवेश व स्वागत समारंभाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सामान्य, गरीब आणि कामगार कुटुंबातील मुलांना कमी खर्चात आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि संस्कारक्षम शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती कार्यक्रमात देण्यात आली.

        कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. दत्तात्रेय मोरे यांनी सांगितले की, शासकीय धोरणांमुळे अनेक सरकारी शाळांचे भविष्य संकटात आले असून खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये वाढलेल्या स्पर्धेमुळे सामान्य आणि गरीब कुटुंबांपुढे मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत सामाजिक भावना आणि सामाजिक जबाबदारी म्हणून ‘नो प्रॉफिट, नो लॉस’ या तत्त्वावर गुरू ग्लोबल प्ले स्कूलची स्थापना करण्यात आली आहे. या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित आणि सुसंस्कारित शिक्षण देण्याचा संकल्प संचालक मंडळाने केला असून पालकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा संचालक मंडळाचे अध्यक्ष पुंडलिक उराडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रामपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहुल बानकर, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य उज्ज्वल शेंडे, सुरेखा उराडे, प्रा. सुनीता जमदाडे, जेष्ठ पत्रकार एम.के. सेलोटे, संतोषी खदाव, निलीमा सेलोटे उपस्थित होते.

        यावेळी शाळेत प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. पालकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रमुख पाहुणे उज्ज्वल शेंडे आणि राहुल बानकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून पालकांचे आभार मानले तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती देताना अध्यक्ष पुंडलिक उराडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक अध्यापन पद्धती, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संस्कार यांचा समन्वय साधला जाणार आहे. विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असून शैक्षणिक गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.

        प्रा. सुनीता जमदाडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना पुणे येथे विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कमी शुल्कात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शाळेचा प्रयत्न असून सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पाल मॅडम, शिवकरण खदाव, अरुण जमदाडे तसेच शाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमीतील महत्त्वाचे मुद्दे
  • राजुरात ‘गुरू ग्लोबल प्ले स्कूल’चा शुभारंभ व प्रवेश समारंभ पार पडला.
  • ‘नो प्रॉफिट, नो लॉस’ तत्त्वावर शाळा सुरू करण्यात आल्याची माहिती.
  • प्रा. दत्तात्रेय मोरे यांनी सामान्य व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी उपक्रम महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
  • अध्यक्ष पुंडलिक उराडे यांनी शाळेच्या आधुनिक शैक्षणिक सुविधांची माहिती दिली.
  • प्रा. सुनीता जमदाडे यांनी पुण्यात प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती केल्याचे सांगितले.
  • विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
  • कमी शुल्कात आधुनिक, संस्कारक्षम व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शाळेचा संकल्प.
#Rajura #GuruGlobalPlaySchool #PlaySchool #Education #SchoolAdmission #QualityEducation #Chandrapur #RajuraNews #MaharashtraNews #Preschool #EarlyEducation #VidarbhaNews #LocalNews #aamchavidarbha #vidarbha #राजुरा #गुरुग्लोबलप्लेस्कूल #प्लेस्कूल #शिक्षण #प्रवेश #चंद्रपूर #राजुरान्यूज #महाराष्ट्रन्यूज #गुणवत्तापूर्णशिक्षण #बालशिक्षण #स्थानिकबातम्या #विदर्भन्यूज

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top