Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सोनिया गांधी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा विद्यार्थ्यांना संदेश आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (दि. ०७ जानेवारी २०२६) -          स्...
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा विद्यार्थ्यांना संदेश
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ०७ जानेवारी २०२६) -
         स्थानिक सोनिया गांधी कनिष्ठ महाविद्यालय व सोनिया गांधी इंग्लिश पब्लिक स्कूल येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. शिक्षण, समानता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

         या जयंती सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या जेष्ठ अध्यापिका अमृता धोटे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था प्रतिनिधी रजनी शर्मा उपस्थित होत्या. यावेळी सोनिया गांधी इंग्लिश पब्लिक स्कूलच्या प्राचार्या कृतिका सोनटक्के, मुख्याध्यापिका शबनम अन्सारी, उपप्राचार्या ज्योत्सना वनकर, शिक्षिका प्रेमिला रोगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

        कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जेष्ठ अध्यापिका अमृता धोटे म्हणाल्या की, महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाचा दिवा पेटवला. त्यांचा शैक्षणिक व सामाजिक वारसा पुढे नेणे ही आजच्या पिढीची सामूहिक जबाबदारी आहे. शिक्षणातूनच समाज परिवर्तन शक्य असून विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या विचारांचा आदर्श जीवनात उतरवावा, असे आवाहन त्यांनी केले.

        कार्यक्रमात विविध सांस्कृतिक व वैचारिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जयश्री ढोबळे यांनी सादर केलेल्या गीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ओजस्वी दिवे व नियती उपरे यांनी सादर केलेल्या समूहगीताला उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली. पल्लवी आदे यांनी सादर केलेले “मी सावित्री बोलते” हे प्रभावी सादरीकरण विशेष आकर्षण ठरले.

        कार्यक्रमाचे संचालन नंदिनी मोरे व अफ्शा कुरेशी यांनी संयुक्तपणे केले. कु. गौरी देव्हारे हिने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची, स्त्री शिक्षणाची व सामाजिक समतेची प्रेरणा निर्माण झाली असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या प्रसंगी शिक्षक, विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

#SavitribaiPhuleJayanti #WomenEducation #EducationForAll #SocialReform #StudentInspiration #SchoolNews #CollegeEvent #MaharashtraEducation #PhuleThoughts #SoniaGandhiCollege #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top