Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पत्रकारांच्या लेखणीत परिवर्तनाची ताकद - ॲड. वामनराव चटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा तालुका पत्रकार संघ व पत्रकार असोसिएशनचा संयुक्त उपक्रम विविध पत्रकार पुरस्कारांनी मान्यवरांचा गौरव आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (...
राजुरा तालुका पत्रकार संघ व पत्रकार असोसिएशनचा संयुक्त उपक्रम
विविध पत्रकार पुरस्कारांनी मान्यवरांचा गौरव
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ०७ जानेवारी २०२६) -
        राजुरा तालुका पत्रकार संघ व राजुरा पत्रकार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात व गौरवपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पत्रकारांच्या कार्याचा गौरव, समाजातील त्यांची भूमिका व जबाबदारी यावर या कार्यक्रमातून सखोल मंथन करण्यात आले.

        या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ शेतकरी नेते तथा माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी भूषविले, तर उद्घाटन काँग्रेस जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार ॲड. संजय धोटे, राजुरा नगर परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरूण धोटे, आदर्श शिक्षण मंडळाचे सचिव अविनाश जाधव, व्हॉईस ऑफ मीडियाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अनिल बाळसराफ, पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. उमाकांत धोटे, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष दिलीप डेरकर, ॲड. दीपक चटप, नगरसेवक भूपेश मेश्राम, एजाज अहमद, किशोर हिंगाणे, सुरेश रागीट, सारंग पांडे, श्रीकृष्ण गोरे यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

         या प्रसंगी लोकमत १८ चे प्रतिनिधी हैदर शेख, सरपंच नंदकिशोर वाढई, संदीप रायपूरे, राजकुमार डाखरे, अविनाश दोरखंडे व प्रकाश काळे या सत्कारमूर्तींचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पकुंडी देऊन गौरव करण्यात आला. याच वेळी विविध पत्रकार पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

        महियार गुंडुविया जेष्ठ पत्रकार पुरस्कार व्हॉईस ऑफ मीडियाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अनिल बाळसराफ, प्रभाकरराव मामुलकर पुरस्कार धनराजसिंह शेखावत, राघवेंद्रराव देशकर पुरस्कार सुग्रीव गोतावळे, सुरेंद्र डोहे पुरस्कार गजेंद्र ढवस, शंकरराव देशमुख पुरस्कार हबीब शेख, तर स्वरस्वतीबाई बोर्डेवार पुरस्कार कु. यीशिता काळे यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कारांचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे होते.

        अध्यक्षीय भाषणात जेष्ठ शेतकरी नेते तथा माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी पत्रकारांच्या लेखणीत अपार सामर्थ्य असून ती समाजात मोठे परिवर्तन घडवू शकते, असे प्रतिपादन केले. मिंथूर येथे सावकारी कर्जापोटी किडनी विक्रीच्या प्रकरणात प्रसारमाध्यमांनी सातत्याने विषय लावून धरल्यामुळेच मोठी कारवाई झाली, याचे उदाहरण देत त्यांनी माध्यमांच्या भूमिकेचे कौतुक केले.

         उद्घाटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांनी पत्रकारांनी समाजात अत्यंत सजग, निर्भीड व जबाबदारीने भूमिका पार पाडावी, असे आवाहन केले. पत्रकार एकत्र येऊन असा कार्यक्रम आयोजित करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

         माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी पत्रकारांच्या भूमिकेवर भाष्य करताना काही बाबींवर परखड मत मांडले, तसेच चांगल्या व लोकाभिमुख पत्रकारितेचे कौतुक केले. माजी आमदार ॲड. संजय धोटे यांनी बातम्यांचा सातत्याने पाठपुरावा झाला तरच त्याचे प्रभावी परिणाम समाजात दिसून येतात, असे मत व्यक्त केले. राजुरा नगर परिषदेचे अध्यक्ष अरूण धोटे यांनी पत्रकारांच्या सजगतेचे कौतुक करत नगरविकासासाठी सकारात्मक सूचना देण्याचे तसेच प्रशासनाच्या चुकांवर निर्भीडपणे बोट ठेवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पत्रकारांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक, महिला व पत्रकार उपस्थित होते.

#JournalistDay #RajuraNews #MediaUnity #PressFreedom #JournalismMatters #VoiceOfMedia #LocalJournalism #ChandrapurNews #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top