आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०७ ऑक्टोबर २०२५) -
राजुरा शहरातील सोमनाथपूर आठवडी बाजार परिसरात तुटलेला रपटा आणि खचलेली नाली नागरिकांच्या डोक्याला ताप ठरत असून, स्थानिकांनी वारंवार तक्रार करूनही नगरपरिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दिनांक 5 जुलै 2025 रोजी या समस्येबाबत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या वतीने नागरिकांनी राजुरा नगरपरिषदेकडे लेखी निवेदन सादर केले होते. सोमनाथपूर आठवडी बाजारातील मुख्य नाली साप व रपटा तुटल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांना हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत. याशिवाय नागेश मडावी यांच्या घराजवळील रपटा तुटल्यामुळे रहिवाशांना तसेच वाहनधारकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
या निवेदनानंतर नगरपरिषदेचे काही कर्मचारी घटनास्थळी जाऊन पाहणी करून गेले. त्यांनी “15 ऑगस्ट झाल्यानंतर 16 वा 17 ऑगस्टला काम सुरू करतो” असे सांगितले होते. मात्र, आता 7 ऑक्टोबर 2025 पर्यंतही कोणतेही काम सुरू झाले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांना तुटलेल्या रपट्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, “जर काही जीवितहानी झाली तर जबाबदार कोण?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे युवा जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र आर.पी. आत्राम यांनी इशारा दिला आहे की, “नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही, तर नागरिकांना घेऊन नगरपरिषदेविरुद्ध आंदोलन छेडण्यात येईल.” स्थानिक नागरिकांनी राजुरा नगरपरिषद चे मुख्य अधिकारी (C.O.) यांना लक्ष घालण्याची आणि तातडीने काम सुरू करण्याची मागणी केली आहे.
#RajuraNews #Somnathpur #ChandrapurUpdate #CivicNegligence #PublicSafety #AdivasiParishad #RajuraMunicipalCouncil #CitizenProtest #RoadSafety #VidarbhaNews #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.