आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०७ ऑक्टोबर २०२५) -
महाराष्ट्र–तेलगंना राज्य सिमेवरील मौजा पोळसा येथे चालणाऱ्या “राजीव समाधान मल्टीपरपज सोसायटी, हिरापूर, ता. कोरपना जि. चंद्रपूर” या नावाखालील मनोरंजन क्लबचा परवाना रद्द करण्यात आला आहे. हा क्लब शिवाजी समाधान बोडे यांच्या नावे चालविण्यात येत होता. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, या मनोरंजन क्लबच्या नावाखाली अवैधरित्या जुगाराचे व्यवहार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकला. ही कारवाई दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी उप पोलिस ठाणे लाठी हद्दीत करण्यात आली.
गुन्हा दाखल आणि कलमांनुसार कारवाई
छाप्यामध्ये पोलिसांनी जुगार साहित्य, रोख रक्कम आणि संबंधित पुरावे जप्त करून पंचनामा केला. यानंतर उप पोलिस ठाणे लाठी येथे गुन्हा क्रमांक २१/२०२५ नोंदविण्यात आला. हा गुन्हा भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३, २३८, २८९, २९२, ४९, ३(५) तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ मधील कलम ४ आणि ५ अंतर्गत दाखल करण्यात आला.
परवान्याच्या अटींचे उल्लंघन
सदर क्लबचा परवाना हा मनोरंजन क्लब म्हणून देण्यात आला होता. परंतु परवान्यातील अटी, शर्ती आणि नियमांचे उल्लंघन करून तेथे अवैध जुगार खेळ चालविण्यात येत असल्याचे उघड झाल्याने पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांनी सविस्तर तपास अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला.
जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णायक आदेश
या प्रस्तावावर विचार करून जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी त्यांच्या अधिकारान्वये क्लबचा परवाना रद्द करण्याचा आदेश जारी केला. या निर्णयानंतर सदर ठिकाणी पुन्हा अशा प्रकारची अवैध कृत्ये होऊ नयेत, यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाला देखील सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत.
पोलीस प्रशासनाची भूमिका
पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई काटेकोरपणे पार पाडली. उप पोलिस निरीक्षक, उप पोलिस ठाणे लाठी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणात तपास सुरू ठेवला असून, इतर संबंधित व्यक्तींचीही चौकशी केली जात आहे.
कारवाईमुळे सीमावर्ती भागात खळबळ
या कारवाईनंतर महाराष्ट्र–तेलगंना सीमावर्ती परिसरातील अशा प्रकारच्या क्लबवर पोलिसांची नजर केंद्रित झाली आहे. स्थानिकांमध्ये या निर्णयाचे स्वागत होत असून, जुगार आणि अवैध कृत्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ही कारवाई दृढ पाऊल मानली जात आहे.
#ChandrapurNews #Korapna #PolsaVillage #IllegalGambling #PoliceAction #EntertainmentClub #LicenseCancelled #LawAndOrder #SPChandrapur #DistrictCollector #MaharashtraTelanganaBorder #CrimeControl #ChandrapurUpdates #AntiGamblingDrive #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.