Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: “रोजगार द्या, अन्यथा गादी सोडा” – युवक काँग्रेसची गर्जना
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
युवक काँग्रेसचा बेरोजगारीविरोधात भजे तळा आंदोलन शंतनू धोटे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेस रस्त्यावर आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (द...
युवक काँग्रेसचा बेरोजगारीविरोधात भजे तळा आंदोलन
शंतनू धोटे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेस रस्त्यावर
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १९ सप्टेंबर २०२५) -
        युवक काँग्रेसतर्फे १७ सप्टेंबर ला  “राष्ट्रीय बेरोजगार दिवस” म्हणून निदर्शने करण्यात आली. या निमित्ताने चंद्रपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसतर्फे बल्लारपूर येथे भजे तळा आंदोलन झाले. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. या आंदोलनात बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील युवक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने बेरोजगार युवक सहभागी झाले. “रोजगार द्या, अन्यथा गादी सोडा”, “बेरोजगारी हटवा – युवा वाचवा” अशा घोषणांनी भजे तळा परिसर दणाणून गेला. सुशिक्षित असूनही रोजगार न मिळाल्याने हताश झालेल्या युवकांनी संताप व्यक्त केला. शासनाने तत्काळ ठोस पावले उचलून बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करून द्यावी, अन्यथा शासनाला युवकांच्या संतापाचा सामना करावा लागेल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.

हि बातमी वाचली का ?

        अलिकडील आकडेवारीनुसार देशातील बेरोजगारी दर सुमारे ७% तर महाराष्ट्रात ८% पर्यंत पोहोचला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील तरुण मोठ्या प्रमाणात शहरांकडे स्थलांतर करत आहेत, पण तेथेही रोजगार मिळणे कठीण झाले आहे. लाखो उच्चशिक्षित युवक भरती प्रक्रियेतील विलंबामुळे घरबसल्या रोजगाराविना आहेत. शेतीतील अस्थिर उत्पन्न, उद्योग-धंद्यांची मरगळ आणि रोजगार निर्मितीतील अपुरेपणामुळे तरुणांमध्ये असंतोष वाढला आहे.

        या आंदोलनात बल्लारपूर शहर काँग्रेस अध्यक्ष पापा आर्या, माजी नगरसेवक माकोडे, काँग्रेस कमिटीचे इस्माईल ढाकवाला, युवक काँग्रेस शहराध्यक्ष नरेश आनंद, पदाधिकारी प्रणय लांडे, गुरनुले तसेच युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि शेकडो बेरोजगार तरुण उपस्थित होते. युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, “बेरोजगार तरुणांना न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष अखंड सुरू राहील.”

#NationalUnemploymentDay #YouthCongress #UnemploymentCrisis #ChandrapurProtest #BallarpurYouth #RightToEmployment #ShantanuDhote #EducatedUnemployed #VoiceOfYouth #JobsForAll #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top