आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. 19 सप्टेंबर 2025) -
भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य लाभले असले तरी निजामशाहीची जुलमी सत्ता 17 सप्टेंबर 1948 रोजी संपुष्टात आली आणि खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झाला. “हा संघर्ष धार्मिक नव्हता, तर अन्यायाविरुद्ध लढलेला लोकलढा होता”, असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार निशिकांत अनंत भालेराव यांनी राजुरा मुक्तीसंग्राम दिन सोहळ्यात उद्घाटन करताना केले.
राजुरा येथील सम्राट सिलेब्रेशन सभागृहात झालेल्या या सोहळ्याचे अध्यक्षस्थान पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून आमदार देवराव भोंगळे, माजी आमदार ॲड. वामनराव चटप, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. राजेश लांजेकर, माजी जि.प. सदस्य अविनाश जाधव, व्यापारी संघ अध्यक्ष संदीप जैन, ज्येष्ठ व्यापारी संघ व ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष सुदर्शन दाचेवार, प्राचार्य दौलत भोंगळे, प्राचार्य डॉ. संभाजी वारकड, सामाजिक कार्यकर्त्या जयश्री देशपांडे, डॉ. उमाकांत धोटे, डॉ. विशाल मालेकर, दिलीप सदावर्ते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या सोहळ्यात सात सत्कारमुर्तींना “राजुरा भूषण” सन्मान प्रदान करण्यात आला, यात
- डॉ. रुपेश कवडू सोनडवले – राजुरा क्षेत्रातील पहिले सर्जन
- डॉ. विशाल सुधाकर बोनगीरवार – संशोधक व कोचिंग विद्यापीठ सदस्य
- ॲड. दीपक यादव चटप – ब्रिटिश सरकारची ''शेवनिंग'' शिष्यवृत्ती प्राप्त वकील
- डॉ. वर्षा दशरथ कुळमेथे–पंधरे – राजुरा क्षेत्रातील पहिली उच्चविभूषित महिला सर्जन
- डॉ. संकेत दिलीप शेंडे – नाभिक समाजातील पहिले डॉक्टर
- रोशन प्रकाश हावडा – सिंधी समाजातील पहिले चार्टर्ड अकाउंटंट
- शोएब अजित शेख – ''क्लिपलिफ'' या दुबईस्थित आंतरराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक
या सर्व सत्कारमुर्तींचा शाल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व साडी देऊन परिवारासह सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानाहून बोलताना डॉ. शरद निंबाळकर म्हणाले की, “विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे सरकारच्या अपयशी धोरणांचे पितळ उघडे पाडतात. या बाबीमुळे समाजमन अस्वस्थ झाले पाहिजे, पण ते होत नाही, ही चिंतेची बाब आहे.” या वेळी आमदार देवराव भोंगळे, ॲड. वामनराव चटप यांनी भाषणे केली. तसेच डॉ. विशाल बोनगिरवार व ॲड. दीपक चटप यांनी मनोगत व्यक्त केले. मानपत्राचे वाचन प्रा. डॉ. विशाल मालेकर, प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी, केशवराव ठाकरे, भिमय्या बोर्डेवार, करूणा गावंडे, सुषमा शुक्ला, प्रिया खंडाळे यांनी केले.
हि बातमी वाचली का ?
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्तीदिन उत्सव समितीचे संयोजक अनिल बाळसराफ यांनी केले. संचालन प्रा. डॉ. अर्चना जुनघरे व ॲड. गायत्री उरकुडे यांनी केले. आभार सहसंयोजक मिलींद देशकर यांनी मानले. स्वागतगीत व देशभक्तीपर गीत अल्का सदावर्ते व ''आरोही संगीत विद्यालयाच्या'' चमूने सादर केले. सोहळ्याची सांगता राष्ट्रगीताने झाली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक मिलींद गड्डमवार, प्रा. डॉ. जगदीश शिंदे, गणेश बेले, कैलाश उराडे, वामन पुरटकर, रंगराव कुळसंगे, स्वतंत्रकुमार शुक्ला, संदीप कोंडेकर, प्रा. कविता कवठे, सुनिता कुंभारे, लता कुळमेथे, प्रा. सुनिता जमदाडे, प्रतिभा भावे, ज्योती कोरडे, रचना देवगडे तसेच मुक्तीदिन उत्सव समिती व ''स्वरप्रिती कला अकादमीच्या'' कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
#RajuraMuktiDin #RajuraBhushan #FreedomStruggle #HistoricalDay #RajuraHonour #ChandrapurEvents #Inspiration #NationalIntegration #UnsungHeroes #CulturalHeritage #Seniorjournalist #NishikantBhalerao #DevraoBhongale #advwamanraochatap #rameshnale #avinashjadhav #SudarshanDachewar #DaulatBhongale #DrSambhajiWarkad #dilipsadavarte #alkasadavarte #DrRupeshSondawale #DrVishaBongirwar #AdvDeepakChatap #DrVarshaKulmethe #drvarshapandhare #DrSanketShende #ca #RoshanHowrah #ShoaibSheikh #Clipleaf #Dubai #rajuramuktidin #rajuramuktidinutsavsamiti #anilbalsaraf #drarchanajunghare #advgayatriurkude #milinddeshkar #drjagdishshinde #ganeshbele #kailashurade #swatantrakumarshukla #aarohisangeetvidyalay #swarpritikalaakadami #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.