24 तास आरोग्यसेवा बंद, नागरिकांनी केली गैरसोयीची तक्रार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १८ सप्टेंबर २०२५) -
महाराष्ट्र शासनाने 05 सप्टेंबर 2025 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार होमिओपॅथिक डॉक्टरांना CCMP (Certificate Course in Modern Pharmacology) पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात आज गुरुवार, 18 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालये, दवाखाने तसेच शासकीय आरोग्यसेवा 24 तास बंद ठेवण्यात आली. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) चंद्रपूर शाखा व महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD) तर्फे या संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
आंदोलनातील मुख्य मुद्दे :
- शैक्षणिक असमानता – MBBS हा 5.5 वर्षांचा अभ्यासक्रम असून CCMP केवळ 1 वर्षाचा कोर्स आहे.
- रुग्ण सुरक्षिततेवर धोका – अपुरे प्रशिक्षणामुळे चुकीचे निदान व उपचार होऊ शकतात.
- दुहेरी प्रणालीचा गोंधळ – MMC ही फक्त MBBS डॉक्टरांसाठी असताना CCMP डॉक्टरांना परवानगी दिल्यास गोंधळ वाढेल.
- कायदेशीर मुद्दा – राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमानुसार आधुनिक औषधोपचार केवळ MBBS डॉक्टरांसाठीच परवान्याने मर्यादित आहेत.
- आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर परिणाम – महाराष्ट्राच्या आरोग्यसेवेवरील विश्वास कमी होण्याचा धोका.
- भविष्यातील दुष्परिणाम – इतर पद्धतीच्या डॉक्टरांकडूनही अशा मागण्या वाढतील.
डॉक्टरांचा ठाम पवित्रा :
- CCMP डॉक्टरांना MMC मध्ये नोंदणी देण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा.
- आधुनिक वैद्यकीय परवाना केवळ MBBS डॉक्टरांनाच द्यावा.
- दिनांक 05/09/2025 चे शासन परिपत्रक मागे घेण्यात यावे.
इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर व MARD चंद्रपूर यांनी रुग्णांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करत शासनाला तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले. आंदोलनाचे नेतृत्व IMA महाराष्ट्र राज्य (2013-14) उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, IMA महाराष्ट्र राज्य (2025-26) उपाध्यक्ष डॉ. संजय घाटे, IMA चंद्रपूर अध्यक्ष डॉ. रितेश दीक्षित, सचिव डॉ. सुश्रुत भुक्ते, डॉ. राहुल सैनानी तसेच MARD चंद्रपूर चे अध्यक्ष डॉ. फुरहान अहमद, उपाध्यक्ष डॉ. नम्रता यादव, उपाध्यक्ष डॉ. देवाशिष घुगे, सचिव डॉ. संजय रिनायत, डॉ. अश्विनी तुंबडे आदींनी संप यशस्वी करण्याचे आवाहन केले होते.
#DoctorsStrike #IMAChandrapur #MARDProtest #HealthcareSafety #CCMPControversy #MBBSOnly #SaveMedicalStandards #PatientSafetyFirst #MedicalCouncilRow #DoctorsUnity #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha #IndianMedicalAssociationChandrapur #drmangeshgulwade #drsanjayghate
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.