Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूरच्या रस्त्यावर महिला कर्मचाऱ्यांचा हुंकार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूरच्या रस्त्यावर महिला कर्मचाऱ्यांचा हुंकार शासनाच्या दुर्लक्षाला महिलांचा निषेध बंडु हिरवे व पवन ढवळे यांच्या नेतृत्वात मोर्चा आमचा व...
चंद्रपूरच्या रस्त्यावर महिला कर्मचाऱ्यांचा हुंकार
शासनाच्या दुर्लक्षाला महिलांचा निषेध
बंडु हिरवे व पवन ढवळे यांच्या नेतृत्वात मोर्चा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
चंद्रपूर (दि. ३० जुलै २०२५) -
        लोक संचालित साधन केंद्र कंत्राटी कर्मचारी संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या वतीने महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे कार्यरत महिलांच्या न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी कार्यरत कर्मचाऱ्यांना आस्थापना खर्च म्हणून लोक संचालित साधन केंद्रांना प्रति केंद्र २५ लाख रुपये निधी शासन स्तरावरून मंजूर करावा, तसेच प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी, या मुख्य मागणीसह विविध समस्यांबाबत हे आंदोलन झाले.

        सदर महामोर्चा चांदा क्लब, वरोरा नाका येथून सुरु होऊन जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे ६०० महिला कर्मचाऱ्यांच्या सहभागाने संपन्न झाला. या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय मजदूर संघाचे जिल्हा अध्यक्ष बंडु हिरवे, जिल्हा मंत्री पवन ढवळे, अनिल बडिवार, तसेच लोक संचालित साधन केंद्र कंत्राटी कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष विनोद मुंगमोडे, श्रीमती दक्षीणा हुमने, वंदना बावणे, विध्या लोखडे, सुरेश गोगले, अक्षय झाडे व सुचिता मुनघाटे यांनी केले.

मागण्यांची ठळक रूपरेषा:
  • प्रत्येक लोक संचालित साधन केंद्राला २५ लाख रुपये प्रशासकीय खर्चासाठी निधी उपलब्ध करणे.
  • समुदाय साधन व्यक्ती व कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करणे.
  • महिला बचत गटांना खेळते भांडवल म्हणून ३०,०००/- रुपये देणे.
  • राष्ट्रीयकृत बँकांमार्फत बचत गटांना ७% व्याजदराने कर्ज उपलब्ध करणे.
  • केंद्र चालवण्यासाठी शासनामार्फत कोणतेही अनुदान न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे मानधन थकीत असल्याने आर्थिक संकट निर्माण.
  • सदर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्य शासनास सादर करण्यात आले.
       आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी सागर गादेवार, विशाल मेश्राम, अमित बानकर, गणेश लोनबले, वृंदा भगत, देवेंद्र मेश्राम, विशाल बंडे, तसेच लोक संचालित साधन केंद्रांचे अध्यक्ष, सचिव, लेखापाल, क्षेत्रीय समन्वयक व CRP यांनी मोलाचे सहकार्य केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top