Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सरकारला झोपेतून उठवणारा शेतकरी मोर्चा!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सरकारला झोपेतून उठवणारा शेतकरी मोर्चा! शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जिवती तहसील कार्यालयावर धडक मोर्चा सुदाम राठोड यांच्या नेतृत्वात आवाज उठवला आ...
सरकारला झोपेतून उठवणारा शेतकरी मोर्चा!
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जिवती तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
सुदाम राठोड यांच्या नेतृत्वात आवाज उठवला
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
चंद्रपूर (दि. २५ जुलै २०२५) -
        शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदामभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटनेच्या वतीने जिवती तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते तहसील कार्यालय हा मोर्चा धडक व शांततेच्या मार्गाने पार पडला.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
  • तहसील कार्यालयाकडून नोटीस देणे थांबवावे,
  • तलाठी रेकॉर्डनुसार नावे असलेल्या शेतकऱ्यांचे पट्टे कायम करावेत,
  • २०२३-२४-२५ या वर्षांच्या नुकसानीची भरपाई व पिकविमा रक्कम तत्काळ द्यावी,
  • सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ करून सातबारा कोरा करावा,
  • ऑफलाइन सातबारावरून फार्मर आयडी व कृषी सौर पंप देण्यात यावेत.

        शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम राठोड यांनी सांगितले की, ३५ वर्षांपासून अतिक्रमण करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, हीच या आंदोलनामागची भूमिका आहे. या मोर्चात स्वतंत्र भारत पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश कदम, युवाध्यक्ष विशाल राठोड, देविदास वारे, रवींद्र राठोड, बालाजी पाचंगे, बालाजी कांबळे, बळीराम मस्के, तुकाराम सिडाम, प्रविण पवार, दत्ता राठोड यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top