Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रमाबाई नगरात महिलेचा खून, अज्ञात आरोपी फरार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रमाबाई नगरात महिलेचा खून, अज्ञात आरोपी फरार अज्ञात मारेकऱ्याचा शोध सुरु आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा (दि. 16 जून 2025) -         शह...
रमाबाई नगरात महिलेचा खून, अज्ञात आरोपी फरार
अज्ञात मारेकऱ्याचा शोध सुरु
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा (दि. 16 जून 2025) -
        शहरातील रमाबाई नगर परिसरात रविवारी सकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडाली. श्रीमती कविता रायपुरे (वय 55) या महिलेला अज्ञात व्यक्तीने अत्यंत क्रूरपणे ठार मारल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. घटना सकाळीच्या सुमारास समोर आली, जेव्हा कविता रायपुरे यांच्या विवाहित मुलीने, ममता अलोणे हिने, दरवाजात टकटक करून प्रतिसाद मिळवण्याचा प्रयत्न केला. प्रतिसाद न मिळाल्याने तिने खिडकीतून आत पाहिलं असता कविता रायपुरे या कॉटवर बेशुद्धावस्थेत दिसून आल्या. दरवाजा उघडल्यानंतर त्या मृत अवस्थेत आढळून आल्या. त्यांच्या डोक्यावर, छातीवर व चेहऱ्यावर तीव्र हत्याराने हल्ला केल्याचे स्पष्ट झाले.

        मृत महिला घरात एकट्याच होत्या. त्यांचा मुलगा सुरक्षा रक्षकाची नोकरी करत असून, तो कामानिमित्त रात्री 8 वाजता घराबाहेर गेला होता. या कुटुंबाचे कोणाशी वाद होते का, किंवा पैशासंबंधी कोणतीही देवाणघेवाण होती का, याचा तपास राजुरा पोलीस करीत आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल होताच पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अज्ञात आरोपीविरुद्ध राजुरा पोलिसांनी भादंवि कलम 302 (ब) व 103 (1) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार सुमित परतीके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा भुते करीत असून आरोपीचा शोध सुरू आहे. कविता रायपुरे यांना दोन मुली व एक मुलगा असून, एक मुलगी राजुरात तर दुसरी मुलगी यवतमाळ येथे वास्तव्यास आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top