Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिवतीत काँग्रेसच्या संघटनबांधणीला गती – डॉ. गोतावळे तालुकाध्यक्ष
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिवतीत काँग्रेसच्या संघटनबांधणीला गती – डॉ. गोतावळे तालुकाध्यक्ष सुभाष धोटेंच्या हस्ते नियुक्ती – काँग्रेसच्या जिवती नेतृत्वात नवा चेहरा आमच...
जिवतीत काँग्रेसच्या संघटनबांधणीला गती – डॉ. गोतावळे तालुकाध्यक्ष
सुभाष धोटेंच्या हस्ते नियुक्ती – काँग्रेसच्या जिवती नेतृत्वात नवा चेहरा
आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी
जिवती (दि. १६ जून २०२५) -
        स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि तालुक्यातील काँग्रेस पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने काँग्रेसने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. माजी आमदार व जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या शिफारशीनुसार, जिवती नगरपंचायतचे नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते डॉ. अंकुश गोतावळे यांची जिवती तालुका काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर आयोजित पदग्रहण सोहळा आणि कार्यकर्ता मेळाव्यात माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते डॉ. गोतावळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील अनेक मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

        कार्यक्रमात बोलताना सुभाष धोटे म्हणाले की, “जिवती तालुक्यातील शेवटच्या माणसापर्यंत काँग्रेसची विचारधारा पोहोचवण्याची जबाबदारी आता डॉ. गोतावळे यांच्या खांद्यावर आहे. त्यांनी संघटन मजबूत करून पक्षाला नवसंजीवनी द्यावी.” डॉ. गोतावळे यांनीही आपल्या भाषणात पक्षाच्या विश्वासाला तडा न जाऊ देता, संपूर्ण निष्ठा आणि जिद्दीने काम करण्याचा संकल्प केला. “तालुक्यात काँग्रेसला पुन्हा जनतेच्या मनात प्रस्थापित करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

        यावेळी काँग्रेसचे विधानसभा समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, जेष्ठ आदिवासी नेते भीमराव पाटील मडावी, माजी सभापती प्रा. सुग्रीव गोतावळे, शामराव कोटनाके, अजगर अली, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष नंदाताई मुसने, अमोल कांबळे, सीताराम मडावी, तिरुपती पोळे, बाळु पतंगे, जंगु येडमे, शबिरभाई, उत्तम कराळे, गणेश शेठकर, मुनीरभाई, मारोती मोरे, शबिरमामु, गणेश वाघमारे, तिरुपती मोरे, काशिनाथ कोमले, हरिश्चंद्र जाधव, परमेश्वर डुरे, दत्ता तोगरे, गणेश पेटकर, परमेश्वर भेसूरे, लक्ष्मण कोडापे, चिन्नू कोडापे, विजय राठोड, प्रल्हाद राठोड, केशव भालेराव, रानुबाई कावळे, जयश्री गोतावळे, अनिता गोतावळे, कराडेताई, उत्तम राठोड, रामदास रणविर, प्रेम राठोड, रविदास आडे यासह जिवती काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top