Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: Bahujan Samaj Party Melava बहुजन समाज पक्षाचा २३ जूनला भव्य जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Bahujan Samaj Party Melava बसपाचा जिल्हास्तरीय संमेलनासाठी कार्यकर्ते सज्ज, सामाजिक परिवर्तनासाठी नवचैतन्य! बहुजन समाज पक्षाचा २३ जूनला भव्य...
Bahujan Samaj Party Melava
बसपाचा जिल्हास्तरीय संमेलनासाठी कार्यकर्ते सज्ज, सामाजिक परिवर्तनासाठी नवचैतन्य!
बहुजन समाज पक्षाचा २३ जूनला भव्य जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १९ जून २०२५) -
        राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पक्षाच्यावतीने २३ जून रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत, चंद्रपूर येथील राजीव गांधी सभागृह, जयंत टॉकीज जवळ, जिल्हास्तरीय भव्य कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची माहिती बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
        कार्यक्रमामागचा उद्देश बहुजन समाजाला संघटित करणे, सामाजिक परिवर्तनाला गती देणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी करणे हा आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात कार्यकर्त्यांद्वारे केडर कॅम्पचे आयोजन करण्यात येत असून, हे संमेलन त्याचाच भाग आहे.

        या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय व महाराष्ट्र प्रभारी अ‍ॅड. राजाराम असतील. तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अ‍ॅड. सुनील डोंगरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात जागृती जथाच्या कार्यक्रमाने होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रा काढत सर्व मान्यवर कार्यक्रमस्थळी दाखल होतील.

        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रभारीमहेंद्र मकेश्वर, जिल्हा सरचिटणीस सुभाष पेटकर, सर्व जिल्हा प्रभारी धर्मेश निकोसे, प्रा. राजेश ब्राह्मणे, नंदू खोब्रागडे, मिलिंद शेंडे, रामराव नन्नावरे, पांडुरंग तुमाराम, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा अलका शिंदे तसेच संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील सेक्टर व बूथ अधिकारी, चंद्रपूर शहर मोर्चा, महिला मोर्चा, पदाधिकारी व कार्यकर्ते नियोजनात गुंतले आहेत. 

        या बैठकीस सर्व कार्यकर्ते, हितचिंतक व समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष रत्नाकर साठे यांनी पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष रत्नाकर साठे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. लाडे, संघटन सचिव संतोष साखरकर, सचिव संजय मेश्राम, महिला मोर्चा अध्यक्षा अलका शिंदे आदी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top