Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ''जननायक राहुल गांधी यांचा वाढदिवस सेवाभावाने साजरा''
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
''जननायक राहुल गांधी यांचा वाढदिवस सेवाभावाने साजरा'' ''रक्तदान करून दिला समाजसेवेचा संदेश!'' गडचांदूर युवक ...
''जननायक राहुल गांधी यांचा वाढदिवस सेवाभावाने साजरा''
''रक्तदान करून दिला समाजसेवेचा संदेश!''
गडचांदूर युवक काँग्रेसचा विधायक उपक्रम
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
कोरपना (दि. १९ जून २०२५) -
         काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, देशाचे विरोधी पक्षनेते आणि जननायक खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस तर्फे गडचांदूर येथील महात्मा गांधी विद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी केले. सुरज गोंडे आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या संयोजनातून हे रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पडले. यामध्ये ५० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण सादर केले. या शिबिरात उपस्थित मान्यवरांनी युवक काँग्रेसच्या या उपक्रमाचे कौतुक करत, "सेवेचा खरा अर्थ समाजासाठी काहीतरी देण्यात आहे," असे उद्गार काढले.

        कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोकराव बावणे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर,  गडचांदूर काँग्रेस शहराध्यक्ष संतोष महाडोळे, सुनील झाडे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष महादेव हेपट, विवेक येरणे, शैलेश लोखंडे, देविदास मून, विलास मडावी, प्रितम सातपुते, इंदर कश्यप, सुरेश पाचभाई, अमन निजामी, श्रीनिवास पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास गडचांदूर काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top