Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शाहू महाराजांचा सामाजिक संदेश महाविद्यालयात जागवला!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शाहू महाराजांचा सामाजिक संदेश महाविद्यालयात जागवला! राजुरात अमली पदार्थविरोधी जनजागृतीची शपथ आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (दि. २७ जून २०...
शाहू महाराजांचा सामाजिक संदेश महाविद्यालयात जागवला!
राजुरात अमली पदार्थविरोधी जनजागृतीची शपथ
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. २७ जून २०२५) -
        ॲड. यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय, राजुरा येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती व जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा पी. पोडे उपस्थित होत्या. प्रास्ताविकही त्यांनीच केले. यावेळी विद्यार्थ्यांना शाहू महाराज यांच्या सामाजिक न्याय, समतेचा संदेश व शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारी योगदानाची माहिती देण्यात आली.

        यानंतर जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून राजुरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार व पोलीस कर्मचारी संघपाल गेडाम यांची उपस्थिती होती. त्यांनी अमली पदार्थांचे शरीर व मनावर होणारे दुष्परिणाम, त्यामधून उद्भवणारी व्यसनाधीनता व गुन्हेगारी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सत्रात विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या अमली पदार्थांपासून दूर राहण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. धनंजय डवरे यांनी केले, तर आभार प्रा. आसावरी जिवतोडे यांनी मानले. या कार्यक्रमाला पर्यवेक्षक प्रा. इर्शाद शेख, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top