Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आदर्श शाळेत विद्यार्थ्यांना मिळाले मोफत एसटी पास
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आदर्श शाळेत विद्यार्थ्यांना मिळाले मोफत एसटी पास शाळेतच पास वितरण, राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी राजुरात प्रभावीपणे आमचा विदर्भ - अनं...
आदर्श शाळेत विद्यार्थ्यांना मिळाले मोफत एसटी पास
शाळेतच पास वितरण, राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी राजुरात प्रभावीपणे
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. २८ जून २०२५) -
        येथील बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर व आदर्श हायस्कूल येथे प्रथमच विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाचे मोफत एसटी बस पास शाळेतूनच वितरित करण्यात आले. या कार्यक्रमात आगार व्यवस्थापक राकेश बोधे, वाहतूक निरीक्षक एस. जी. लाडसे, लिपिक कुलदीप दुबे, मुख्याध्यापिका नलिनी पिंगे (आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर), मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर (आदर्श हायस्कूल), राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले, स्काऊट मास्तर रूपेश चिडे, तसेच सहाय्यक शिक्षक विकास बावणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

        शालेय वर्ष २०२५-२६ पासून विद्यार्थ्यांना बस पास मिळवताना होणाऱ्या त्रासाचे निर्मूलन व्हावे, पालक व विद्यार्थ्यांचा वेळ वाचावा आणि कार्यालयीन गर्दी टाळावी या हेतूने शासनाच्या सूचनेनुसार शाळेमध्येच पास वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत आदर्श हायस्कूल मधील ३० आणि आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर मधील २८ विद्यार्थ्यांना बस पास वितरित करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या निर्णयाबद्दल राज्य शासन, राज्य परिवहन महामंडळ तसेच राजुरा आगार प्रशासनाचे विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आभार मानले. पालकांनीही हा निर्णय स्वागतार्ह व समाधानकारक असल्याचे मत व्यक्त केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top