Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बंटी उर्फ शुभम पिपरे यांच्या नेतृत्वात राजुरा युवासेना मजबूत होणार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बंटी उर्फ शुभम पिपरे यांच्या नेतृत्वात राजुरा युवासेना मजबूत होणार शिवसेना म्हणजे फक्त राजकारण नव्हे, तर एक चळवळ आहे – नव्या जबाबदाऱ्या नव्य...
बंटी उर्फ शुभम पिपरे यांच्या नेतृत्वात राजुरा युवासेना मजबूत होणार
शिवसेना म्हणजे फक्त राजकारण नव्हे, तर एक चळवळ आहे – नव्या जबाबदाऱ्या नव्या प्रेरणा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २२ जून २०२५) -
        शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना चंद्रपूर जिल्ह्याच्या संघटनात्मक बांधणीला गती देताना, युवासेनेच्या पदांचा विस्तार करण्यात आला आहे. युवासेना प्रमुख माननीय आमदार श्री. आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार, युवासेना सचिव माननीय आमदार वरूण सरदेसाई, कार्यकारिणी सदस्य मा. हर्षल दादा काकडे, पूर्व विदर्भ विभागीय सचिव मा. निलेश बेलखेडे आणि चंद्रपूर जिल्हा विस्तारक मा. संदीप रियाल पटेल यांच्या सूचनेनुसार व चंद्रपूर जिल्हाप्रमुख मा. विक्रांतभाऊ सहारे यांच्या नेतृत्वात बंटी उर्फ शुभम अरुण पिपरे यांची युवासेना राजुरा शहर अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

        या नियुक्तीनिमित्त युवासेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख मा. विक्रांत सहारे आणि विस्तारक मा. संदीप रियाल पटेल यांनी बंटी उर्फ शुभम पिपरे यांना नियुक्तीपत्र प्रदान करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी युवासेना राजुरा विधानसभा उपजिल्हा प्रमुख कुणाल निळकंठ कुडे, तालुका प्रमुख बंटी मालेकर, तालुका चिटणीस प्रवीण पेटकर, कोरपना तालुका प्रमुख अंकुश वांढरे यांच्यासह अनेक युवासैनिक उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top