Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आर्ट ऑफ लिव्हिंग मार्गदर्शकांच्या उपस्थितीत प्रभावी योग सत्र
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आर्ट ऑफ लिव्हिंग मार्गदर्शकांच्या उपस्थितीत प्रभावी योग सत्र श्रीतेज प्रतिष्ठान व महात्मा गांधी विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यदायी उ...
आर्ट ऑफ लिव्हिंग मार्गदर्शकांच्या उपस्थितीत प्रभावी योग सत्र
श्रीतेज प्रतिष्ठान व महात्मा गांधी विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यदायी उपक्रम
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
गडचांदूर (दि. २२ जून २०२५) -
        स्थानिक श्रीतेज प्रतिष्ठान व महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ निमित्त एक भव्य योग कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची संपूर्ण आयोजन प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. विद्यार्थ्यांपासून ते स्थानिक नागरिकांपर्यंत सर्व योगप्रेमी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. संजयजी आसुटकर, सौ. अंजली खेतान आणि श्री. मिलिंद गंपावार यांनी उपस्थितांना योगाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक लाभ पटवून दिले. त्यांनी प्रत्यक्ष योगासने, प्राणायाम आणि ध्यान सत्राचे प्रात्यक्षिक देऊन सर्व सहभागींचा सहभाग वाढवला. यावेळी युवा नेते निलेश ताजने प्रामुख्याने उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे तीन प्रमुख उद्दिष्ट होते :-
  • शारीरिक आरोग्य सुदृढ करणे
  • मानसिक व अंतःशांतीचा प्रसार
  • समाजात एकतेचा संदेश देणे
        सकाळी लवकर सुरू झालेल्या या कार्यक्रमात श्रीतेज प्रतिष्ठानचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक, विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच योगाभ्यासक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना आरोग्यदायी, तणावमुक्त व समतोल जीवनाची शुभेच्छा देण्यात आल्या. श्रीतेज प्रतिष्ठान व व महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय द्वारे आयोजित या उपक्रमामुळे समाजात योगसाधनेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, युवक व विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह व सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top