Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कत्तलीसाठी जनावरांची बेकायदेशीर वाहतूक थांबवली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कत्तलीसाठी जनावरांची बेकायदेशीर वाहतूक थांबवली ७२ गोवंशांसह सहा ट्रक जप्त; पोलिसांची धडक कारवाई आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. २१ जू...
कत्तलीसाठी जनावरांची बेकायदेशीर वाहतूक थांबवली
७२ गोवंशांसह सहा ट्रक जप्त; पोलिसांची धडक कारवाई
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २१ जून २०२५) -
        घुग्घुस-पडोली मार्गावर धानोरा टोल नाक्यावर चंद्रपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत ६ आयशर ट्रकद्वारे कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या वाहतूक होत असलेले ७२ गोवंश जनावरे जप्त केली. या प्रकरणात एकूण १८ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे घुग्घुस रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली होती. सदर ट्रकांची तपासणी केली असता जनावरे निर्दयतेने पाय व तोंड बांधून क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात भरलेले आढळले. ट्रकचालकांनी जनावरांची खरेदी भंडारा व गोंदिया येथून केल्याच्या पावत्या सादर केल्या, मात्र त्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या असल्याचे उघड झाले. या कारवाईत पोलिसांनी ६ आयशर ट्रक, १ पायलटिंग वाहन, एकूण किंमत १,७०,७०,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गोवंश प्राणी छोटा नागपूर, प्यार फाउंडेशन, चंद्रपूर यांच्याकडे तात्पुरत्या काळजीसाठी देण्यात आले आहेत.

        सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू मॅडम, पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, सपोनि बलराम झाडोकार, स्थानिक गुन्हे शाखा आणि घुग्घुस पोलिसांचे पथक, तसेच पशुधन विकास अधिकारी, घुग्घुस.खालील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या गंभीर प्रकारामुळे अवैध कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या टोळ्यांच्या विरोधात कठोर कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top