Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: "भाजप बल्लारपूरचा योग दिन उपक्रम - आरोग्यदायी भारतासाठी एक पाऊल पुढे!"
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"भाजप बल्लारपूरचा योग दिन उपक्रम - आरोग्यदायी भारतासाठी एक पाऊल पुढे!" "सुधीरभाऊंच्या मार्गदर्शनात योग साधनेचा प्रेरणादायी अन...
"भाजप बल्लारपूरचा योग दिन उपक्रम - आरोग्यदायी भारतासाठी एक पाऊल पुढे!"
"सुधीरभाऊंच्या मार्गदर्शनात योग साधनेचा प्रेरणादायी अनुभव!"
आमचा विदर्भ - राजेश अरोरा 
बल्लारपूर (दि. २१ जून २०२५) -
        "विकसित भारताचा अमृत काळ – मोदी सरकारची सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची ११ वर्षे" या अभियानांतर्गत बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भाजप चंद्रपूर ग्रामीण, भाजप बल्लारपूर आणि पतंजली योग समिती बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

        कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे माजी वनमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी उपस्थित योग साधकांना मार्गदर्शन करताना सांगितले, "योग हा केवळ आरोग्य टिकवण्याचा मार्ग नाही, तर शरीर, मन आणि आत्म्याच्या संतुलनाचा अधारस्तंभ आहे. निरोगी भारतासाठी प्रत्येकाने योग करावा."

        कार्यक्रमात भाजपचे वरिष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, माजी नगराध्यक्ष व भाजप जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) हरीश शर्मा, डॉ. मंगेश गुलवाडे, काशिनाथ सिंह, अँड. रणजयसिंह, निलेश खरबडे, समीर केने, देवेंद्र वाटकर, सतीश कणकम, तसेच योग प्रशिक्षक ऋषिपाल गहलोत उपस्थित होते. या योग सत्रात सुमारे १००० भाजप कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला मंडळ, युवक मोर्चा, व अनेक नागरीक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध आणि सकारात्मक वातावरणात पार पडले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top