Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गांजासह 19 वर्षीय युवक अटकेत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गांजासह 19 वर्षीय युवक अटकेत पोलिसांची NDPS अंतर्गत कारवाई आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स भद्रावती (दि. 21 जून 2025) -         भद्रावती पोलि...
गांजासह 19 वर्षीय युवक अटकेत
पोलिसांची NDPS अंतर्गत कारवाई
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
भद्रावती (दि. 21 जून 2025) -
        भद्रावती पोलिसांनी गांजासदृश अमली पदार्थ वाहून नेणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला अटक करत NDPS कायद्यानुसार कारवाई केली आहे. आरोपीकडून एकूण 89,180 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे भद्रावती पोलीस ठाण्याचे सपोनि मोहन धोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग करत असताना DB पथकाने 20 जून रोजी रात्री 11 वाजल्यापासून ते 21 जूनच्या पहाटे 1 वाजेपर्यंत भद्रावती येथे सापळा रचून कार्यवाही केली.

        पोलिसांनी तपासणी केली असता क्षितिज संजय जुनघरे वय 19 रा. भद्रावती याच्या पाठीवर असलेल्या बॅगमध्ये 1 किलो 480 ग्रॅम गांजासदृश पदार्थ आढळून आला, ज्याची बाजारातील किंमत सुमारे 29,080 इतकी आहे. शिवाय, आरोपीच्या ताब्यातील हीरो स्प्लेंडर दुचाकी MH 34 AJ 3464 ही अंदाजे 60,100 किंमतीची असल्याचे आढळून आले. पोलिसांनी असा एकूण 89,180 चा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी सदर प्रकरणात NDPS कायद्यातील कलम 8(क), 20(ब)(ii)(ब) सह मोटार वाहन कायद्याचे कलम 3(1)/181 व 130/177 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top