Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: माणिकगड ठिय्या आंदोलनाची अखेर प्रशासनाकडून दखल!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माणिकगड ठिय्या आंदोलनाची अखेर प्रशासनाकडून दखल! सात महिन्यांच्या संघर्षानंतर जिल्हाधिकारी स्तरावर बैठक निश्चित चंद्रपूर (दि. १३ जून २०२५) – ...
माणिकगड ठिय्या आंदोलनाची अखेर प्रशासनाकडून दखल!
सात महिन्यांच्या संघर्षानंतर जिल्हाधिकारी स्तरावर बैठक निश्चित
चंद्रपूर (दि. १३ जून २०२५) –
        कोरपना तालुक्यातील कुसुंबी-नोकारी-बाम्बेझरी शिवारात माणिकगड सिमेंट (अल्ट्राटेक युनिट) कंपनीच्या उत्खनन प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या आदिवासी कोलाम समाजाने सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाची अखेर प्रशासनाने दखल घेतली आहे. तब्बल ७ महिन्यांच्या सलग आंदोलनानंतर पोलीस अधीक्षक ममुका सुदर्शन यांच्या हस्तक्षेपामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित होणार आहे.

        गेल्या बारा वर्षांपासून कंपनीच्या भूमिगत उत्खनन प्रकल्पामुळे कोलाम आदिवासी समाजाचे शेत, पाणी स्रोत, आणि धार्मिक स्थळांवर घात झाला. शासनाच्या दुर्लक्षामुळे न्यायासाठी आदिवासी समाजाने मानवाधिकार आयोग, अनुसूचित जनजाती आयोग व मुख्यमंत्र्यांकडे सतत अर्ज सादर केले. मात्र कुठलीही ठोस चौकशी किंवा कार्यवाही झाली नाही.

        या आंदोलनात महिलांसह वयोवृद्ध नागरिक देखील सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल करून दडपशाही केली. मात्र, कंपनीने लीजविना जमिनीवर कब्जा करून बेकायदेशीर बांधकाम, रस्ते अडथळा, मंदिर प्रवेश बंदी, शेतकऱ्यांचे हक्क डावलणे यासारखे गंभीर गुन्हे केले असतानाही कारवाई टाळण्यात आली. पोलीस अधीक्षकांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून जिल्हा प्रशासनाकडे प्रश्न सोडवण्याचा आग्रह धरला. परिणामी, १८ जून रोजी राजुरा येथे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली जाणार आहे.

        राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सहसचिव आबिद अली यांनी प्रशासनाने कुठेही बैठक घेतली तरी निर्णयावर ठाम राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तर आंदोलक केशव कुळमेथे, भाऊराव कनाके, अरुण गो. आत्राम, मारुती तलांडे, गणेश सिडाम यांनी “प्रश्न सुटला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करू” असा इशारा दिला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top