Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा गुणवंतांचा गौरव, वृक्षारोपण आणि पुस्तक वाटपाने वाढदिवसाचा उत्सव राजुरा युवा सेनेचा उपक्र...
आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
गुणवंतांचा गौरव, वृक्षारोपण आणि पुस्तक वाटपाने वाढदिवसाचा उत्सव
राजुरा युवा सेनेचा उपक्रमशील पुढाकार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. १२ जून २०२५) –
        शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे युवासेना प्रमुख, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य व आमदार आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस राजुरा तालुक्यात विविध समाजोपयोगी उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

        या उपक्रमांतर्गत इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. राजुरा येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वसतिगृहातील विद्यार्थ्यांना बुक व पेनचे वाटप करण्यात आले. तसेच रामपूर येथे वृक्षारोपण करण्यात आले. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांना एकूण ३५ कुंड्यांची भेट देण्यात आली.

        कार्यक्रमाच्या आयोजनात शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन पिपरे, राजुरा विधानसभा प्रमुख संदीप वैरागडे, तालुका प्रमुख प्रदीप येनूरकर, शहर प्रमुख कुणाल निळकंठ कुडे, युवासेना तालुका चिटणीस व उपतालुका प्रमुख रमेश झाडे, उपजिल्हा प्रमुख बंटी दादाजी मालेकर, तालुका प्रमुख प्रवीण रमेश पेटकर, पदाधिकारी बबलू चौहान, अतुल खनके, ग्रामपंचायत सदस्य रामपूर, युवासेना विभाग प्रमुख गणेश चोथले (आर्वी-रामपूर), उपतालुका प्रमुख रमेश कमटम (आर्वी-रामपूर), माजी उपतालुका प्रमुख व माजी उपसरपंच (धोपटाळा) निखिल गिरी, तसेच कार्यकर्ते अक्षय लांडे, श्रावण गोरे, ओम वांढरे, हर्षल निमकर, मनीष लांडे, ऋतिक काळे, श्रीनाथ बोल्लूरवर, उपशहर प्रमुख गौरव चन्ने, शहर विभाग प्रमुख बबलू डाखरे आदी उपस्थित होते. 

        या वेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे बादल बेले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वसतिगृहाचे विद्यार्थी, तसेच मोहनदास मेश्राम, लोमेश मडावी, नरेश नुगुरवार व रामपूर ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले. या विविध उपक्रमांमधून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, युवासेनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली जात आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top