Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भरधाव वाहनातून अवैध दारू जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भरधाव वाहनातून अवैध दारू जप्त गुप्त माहितीवरून पोलिसांची कारवाई आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स कोठारी - चंद्रपूर (दि. १३ मे २०२५) -        क...
भरधाव वाहनातून अवैध दारू जप्त
गुप्त माहितीवरून पोलिसांची कारवाई
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
कोठारी - चंद्रपूर (दि. १३ मे २०२५) -
       कोठारी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे देशी-विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना अटक केली असून, एकूण ३,२४,९७० रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ही कारवाई १३ एप्रिल रोजी करण्यात आली. पोलीस स्टेशन कोठारी अंतर्गत, गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कोठारी चौकात नाकाबंदी केली होती. या दरम्यान, हुंडाई आयन कार एमएच३३ - ए - ३००२ थांबवण्याचा प्रयत्न केला असता, वाहन चालकाने भरधाव वेगाने वाहन पळवले. पोलिसांनी त्याचा तातडीने पाठलाग करून गणपुर गावाजवळ वाहन थांबवले. पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता, डॅशबोर्डमध्ये गुप्तरित्या लपवलेली दारू आढळली. जप्त केलेली मालमत्तेत ९० एमएल देशी दारूच्या ५२ प्लास्टिक बाटल्या, ८० एमएल रॉयल स्टॅगच्या २१ बाटल्या, हायवर्ड ५००० बिअरच्या बाटल्या, हुंडई आयन कार जप्त करण्यात आली. 

        वाहन चालक रितीक निलकंठ कन्नाके वय २९ वर्षे, रा. बल्लारशाह, क्लिनर मुख्तार मुस्ताक शेख वय ३१ वर्षे, रा. बल्लारशाह याना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस स्टेशन कोठारीचे ठाणेदार सपोनि योगेश खरसान आणि त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी ही धाडसी कामगिरी केली आहे. कोठारी पोलीस विभाग अवैध दारू वाहतुकीवर कडक कारवाई करत आहे. अशा कारवायांमुळे जिल्ह्यातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top