Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर  (दि. १३ मे २०२५) -     ...
प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर (दि. १३ मे २०२५) -
       चंद्रपूर शहर पोलिसांनी प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू (Eagle, Hola, Shisha Hookah) विक्री करणाऱ्या किराणा व्यापाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे. (९ मे रोजी) गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जुनोना चौक येथील किराणा दुकानात छापा मारला. गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक बच्छिरे आणि त्यांच्या पथकाने पंचासमक्ष दुकानाची तपासणी केली. या तपासणीत दुकानात २७,८४० रुपये किमतीचे सुगंधित तंबाखूचे पाऊच ईगल हुक्काह शिशा तंबाखू जप्त करण्यात आले.

        अवैध तंबाखू विक्री करताना अटक केलेल्या आरोपीचे नाव नितेश मुकूंदा वाकडे वय ३२ वर्षे, रा. जुनोना चौक असे आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चौकशी केली असता, त्याने सदर तंबाखूचा पुरवठा वसीम झिमरी रा. घुटकाला वार्ड याच्याकडून झाल्याचे सांगितले. पोलिसांनी नितेश वाकडे आणि वसीम झिमरी या दोघांविरुद्ध अपराध क्रमांक ३३४/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७४, २७५, १२३ सह अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ आणि नियम २०११ नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोउपनि बच्छिरे आणि पथकाने या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. चंद्रपूर शहर पोलीस अवैध तंबाखू विक्रीवर कडक नजर ठेवून आहेत. या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर तंबाखू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top