देशी-विदेशी दारूची अवैध वाहतुक करणाऱ्या इसमास अटक
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
गोंडपिपरी (दि. १३ मे २०२५) -
गोंडपिपरी पोलीस ठाण्याच्या पथकाने देशी-विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका इसमास अटक करून सुमारे ८,५२,७९० रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. ही कारवाई १२ मे २०२५ रोजी गुप्त माहितीच्या आधारे मौजा विठठलवाडा फाटा येथे नाकाबंदी करून करण्यात आली.
गोंडपिपरी पोलीस ठाण्याच्या पथकाने चारचाकी पिकअप वाहन क्रमांक: एमएच२४ जे ९५६४) थांबवून पंचासमक्ष तपासणी केली असता, वाहनात परवान्याविना अवैध देशी व विदेशी दारू आणि बिअरचा साठा आढळून आला. या साठ्याची एकूण किंमत ३,५२,७९० रुपये असून, वाहनासह एकूण ८,५२,७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध दारू वाहतुकीच्या या प्रकरणात भावेश दिलीप वानोडे वय २७ वर्षे, रा. चंद्रपूर या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सपोनि रमेश हत्तीगोटे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकातील पोलीस अंमलदार विलास कोवे, अतुल तोडासे, प्रशांत नैताम, सचिन झाडे, सुनिल गव्हारे, सचिन गायकवाड, मनिषा ठाकरे आणि सैनिक दुर्याधन चलाख यांनी ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली. गोंडपिपरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यातील अवैध दारू वाहतूक रोखण्यात महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. स्थानिक पोलिसांनी अशा प्रकारच्या अवैध कृत्यांवर कडक कारवाई सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.