Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अल्पवयीन मुलीला देह व्यापारात ढकलणाऱ्या महिलेवर पोलिसांची धडक कारवाई
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अल्पवयीन मुलीला देह व्यापारात ढकलणाऱ्या महिलेवर पोलिसांची धडक कारवाई आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर (दि. १३ मे २०२५) -        चंद्र...
अल्पवयीन मुलीला देह व्यापारात ढकलणाऱ्या महिलेवर पोलिसांची धडक कारवाई
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर (दि. १३ मे २०२५) -
       चंद्रपूर शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे महाकाली वार्ड, गौतम नगर येथील खोलीवर छापा मारून देह व्यापाराचे रॅकेट उघड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीची सुटका केली असून, देह व्यापार चालवणाऱ्या अमीना सैयद या महिलेला अटक केली आहे. १३ मे रोजी, पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे चंद्रपूर शहरातील अमीना सैयद नावाच्या महिलेकडून देह व्यापार चालवला जात असल्याचे समजले. पोलिसांनी पंचासमक्ष खोलीची झडती घेतली असता, खोलीत १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी आढळली. पोलिसांनी मुलीची विचारपूस केली असता, तिने कबूल केले की ती अमीना सैयदच्या सांगण्यावरून देह व्यापार करीत होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अमीना सैयद हिला तात्काळ अटक केली.

        अमीना सैयदच्या विरोधात चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १४३ (४) भारतीय दंड संहिता आणि महिला व मुलींचे अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ (PITA) अंतर्गत कलम ३, ४, ५, ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक श्रीमती प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोउपनि संदीप बच्छेरे, मपोहवा भावना रामटेके, पोहवा सचिन बोरकर, संतोष कनकम, संजय घोटे, नापोअं कपुरचंद खैरवार, पोअं इमरान खान, इरशाद खान, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम, रुपेश पराते, मपोअ सारीका गौरकार, दिपीका झिंगरे यांनी ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली. अल्पवयीन मुलींचे शोषण टाळण्यासाठी आणि महिलांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी या प्रकारच्या अनैतिक कृत्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top