मानसिक आजारांवर संमोहन उपचार
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ०९ मे २०२५) -
सेवा निवृत्त उपप्राचार्य हरिभाऊ पांडुरंग डोर्लीकर यांना संमोहन उपचार आणि वैकल्पिक चिकित्सा या विषयावर केलेल्या संशोधनात्मक प्रबंधासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठाने पीएचडी (आचार्य) पदवी बहाल केली आहे. डोर्लीकर यांनी मानसिक आणि शारीरिक ताणतणाव, डिप्रेशन, एनझायटी, स्मरणशक्ती गमावणे, आत्मविश्वासाची कमतरता, व्यसनमुक्ती, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या यावर संमोहनाच्या माध्यमातून प्रभावी उपचार सिद्ध केले आहेत.
एप्रिल २०१७ मध्ये शिवाजी महाविद्यालय, राजुरा येथून उपप्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी संमोहन आणि वैकल्पिक चिकित्सा क्षेत्रात संशोधन सुरू ठेवले. त्यांनी महाराष्ट्रभर १००० पेक्षा अधिक संमोहन शोच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व जनजागृतीचे कार्य केले आहे. या कार्यात त्यांचे मार्गदर्शक डॉ. अजय ससाने (मुंबई) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.