Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गांजा तस्करी प्रकरण; १२४५ ग्रॅम गांजा जप्त, जिवती पोलिसांची कारवाई
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गांजा तस्करी प्रकरण; १२४५ ग्रॅम गांजा जप्त, जिवती पोलिसांची कारवाई आमचा विदर्भ - अनंता गोखरे चंद्रपूर / जिवती (दि. १४ मे २०२५) -         जिव...
गांजा तस्करी प्रकरण; १२४५ ग्रॅम गांजा जप्त, जिवती पोलिसांची कारवाई
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर / जिवती (दि. १४ मे २०२५) -
        जिवती तालुक्यातील कुंभेझरी येथे गांजाची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. अनिल पांडुरंग बसवंते वय ३६ वर्षे रा. कुंभेझरी असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे १२४५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलेला आहे.

        जिवती पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी अनिल पांडुरंग बसवंते हा आपल्या घरात अवैधरित्या गांजा बाळगून चिल्लर विक्री करीत होता. या माहितीनंतर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी गडचांदूर रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कांचन पांडे, पोलीस अंमलदार जगदीश मुंडे, ज्ञानेश्वर डोकळे, किरण वाठोरे, अतूल कानवटे व दोन पंच यांच्या उपस्थितीत आरोपीच्या घराची झडती घेण्यात आली.

        झडतीदरम्यान, आरोपीच्या घरातील किचन रूममध्ये किचन ओट्याखाली एका कापडी पिशवीमध्ये १२४५ ग्रॅम वजन असलेला गांजा किंमत १२,००० रुपये जप्त करण्यात आला. या प्रकरणी जिवती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४३/२०२५ अंतर्गत कलम २० (ब) गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात आरोपी अनिल पांडुरंग बसवंते यास अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश वाडीवा करत आहेत.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top