Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा! आदर्श हायस्कूलची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा कायम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
StudentAchievement गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा! आदर्श हायस्कूलची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा कायम आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (दि. १४ म...
StudentAchievement
गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा!
आदर्श हायस्कूलची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा कायम
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. १४ मे २०२५) -
        बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श हायस्कुल राजुरा येथील इयत्ता दहावीच्या माध्यमिक शालांत परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. या वर्षी शाळेचा निकाल ९५.७०% इतका आहे. एकूण ९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. शाळेतून प्रथम क्रमांक आदित्य सुभाष साळवे (९१.२०%), द्वितीय क्रमांक मृणाली बंडू भोयर (९०.२०%) आणि तृतीय क्रमांक क्षितिज विनोद वडस्कर (८९.६०%) यांनी मिळवला. या गुणवंत विद्यार्थ्यांचा बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

        या कार्यक्रमाला बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक आणि माजी आमदार ॲड. संजय धोटे, अध्यक्ष सतीश धोटे, उपाध्यक्ष मनोहर साबणानी, सचिव भास्करराव येसेकर, सह सचिव शंकरराव काकडे, कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकिवार यांसह संचालक मधुकर जानवे, अविनाश नीवलकर, मंगला माकोडे उपस्थित होते. यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर, मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, नवनाथ बुटले, मेघा वाढई, प्रशांत रागीट, विकास बावणे, आशा बोबडे, भाग्यश्री क्षीरसागर, अंजली कोंगरे यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top