Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांयांचा 'स्टार्टअप इंडिया ग्रोथ लीडर' पुरस्काराने गौरव
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांचा 'स्टार्टअप इंडिया ग्रोथ लीडर' पुरस्काराने गौरव आमचा विदर्भ - दीपक शर्मा नवी दिल्ली (दि. ०९ मे २०२५) - एम...
डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांचा 'स्टार्टअप इंडिया ग्रोथ लीडर' पुरस्काराने गौरव
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
नवी दिल्ली (दि. ०९ मे २०२५) -
एमएसएमई भारत समिट २०२५ मध्ये डॉ. रमेशकुमार एस. बोरकुटे यांना 'स्टार्टअप इंडिया ग्रोथ लीडर' या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले. दि. ६ मे २०२५ रोजी हॉटेल हॉलिडे इन, मयूर विहार, नवी दिल्ली येथे हा कार्यक्रम पार पडला. संपूर्ण दिवसभर चालणाऱ्या या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यहोवा यिरे फाऊंडेशनचे सिईओ डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांनी या समारंभात सहभाग घेतला. त्यांनी त्यांच्या फाऊंडेशनद्वारे आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि उद्योग प्रशिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवा केली आहे. 'शिका, कमवा आणि प्रगती करा' या तत्त्वावर आधारित त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना 'स्टार्टअप इंडिया ग्रोथ लीडर २०२५' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय एमएसएमई राज्यमंत्री सौ. शोभाताई करंदलाजे, राज्यसभा खासदार मा. श्री नीरज शेखर, तसेच डॉ. (एच.सी.) सीएस अ‍ॅड. ममता बिनानी, भारतातील पहिले नोंदणीकृत दिवाळखोरी व्यावसायिक आणि माजी अध्यक्ष - आयसीएसआय उपस्थित होते. या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत समिट यशस्वीरित्या पार पडली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top