Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दोन गुन्हेगारांकडून तीन मोटारसायकल जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दोन गुन्हेगारांकडून तीन मोटारसायकल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी आमचा विदर्भ - अनंता गोखरे चंद्रपूर  (दि. ०९ मे २०२५) -         स्थानिक...
दोन गुन्हेगारांकडून तीन मोटारसायकल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ०९ मे २०२५) -
        स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चंद्रपूर जिल्ह्यात पेट्रोलिंग दरम्यान ही कामगिरी बजावली. मुखबिरांकडून माहिती मिळाल्यानंतर बंगाली कॅम्प चौक येथे सापळा रचून आरोपी शानु देविदास चिकराम (वय २०, रा. टेकडी, ता. मुल) आणि नचिकेत चतुर ठाकरे (वय २२, रा. भेजगाव, ता. मुल) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण तीन मोटारसायकली, ज्यांची किंमत १.७० लाख रुपये आहे, जप्त करण्यात आल्या आहेत. सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन साहेब, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे सहकार्य या यशस्वी कारवाईत मोलाचे ठरले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top