कोंबडे लढतीवर छापा ; चार जणांवर कारवाई
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. 28 मार्च2025) -
लोणी (ता. कोरपना) येथे सुरू असलेल्या कोंबडे लढतीवर स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने छापा टाकून जुगार खेळणाऱ्या चार जणांवर कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, झुंझी करिता वापरले जाणारे कोंबडे तसेच मोटरसायकलींसह एकूण 2,45,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई केली. यात अमोल साधुजी खरवडे वय 40, रा. लोणी, संजय शालिक क्षीरसागर वय 29, रा. वनसडी, अनिल किसन बेलेकर वय 54, रा. कोलगाव, ता. मालेगाव, जि. यवतमाळ आणि राजेंद्र नानाजी किरटकर वय 46, रा. गोधनी, ता. मालेगाव, जि. यवतमाळ यांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळावरून 3 हजार 600 रुपये रोख, चार जिवंत कोंबडे व चार मोटरसायकली जप्त केल्या. आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन कोरपना येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 12 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.