Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: लोककल्याणासाठी विविध योजनांचे लाभ वितरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लोककल्याणासाठी विविध योजनांचे लाभ वितरण जिल्हा परिषद हायस्कूलमधील विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (दि. २९ मा...
लोककल्याणासाठी विविध योजनांचे लाभ वितरण
जिल्हा परिषद हायस्कूलमधील विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. २९ मार्च २०२५) -
        सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, समाजकल्याण विभाग आणि पंचायत समिती राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक पंचायत समितीच्या पटांगणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात किशोरवयीन मुलींसाठी जेंडर प्रशिक्षण, समाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना तसेच पंचायत समिती अंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कार व लाभांचे वितरण करण्यात आले.

       या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. देवराव भोंगळे यांच्या हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहायक गट विकास अधिकारी श्रीकांत बोकडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी अमित मेश्राम, विस्तार अधिकारी नेवारे, भाजप शहर महामंत्री मिलिंद देशकर, सचिन डोहे, प्रदीप पाला, डॉ. सुवर्णा गेडाम आणि मंगेश बोबाटे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषद हायस्कूलमधील विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. तसेच विविध महिला कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. इतर गरजू लाभार्थ्यांनाही आवश्यक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा उपक्रम शासनाच्या लोककल्याणकारी धोरणाचा भाग असून, अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top