अवैध देशी दारू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २९ मार्च २०२५) -
तळोधी पोलीस स्टेशनच्या पथकाने एका संशयित चारचाकी वाहनावर कारवाई करत मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू जप्त केली. पोलीस स्टेशन तळोधीचे ठाणेदार, सपोनि संगीता शंकरराव हेलोंडे यांना गुप्त माहिती मिळाली की, नागभीडहून तळोधीकडे येणाऱ्या एका वाहनात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलीस उपनिरीक्षक किशोर मानकर, पोहवा रत्नाकर देहारे, मपोअं वैष्णवी लेनगुरे, पोअं उत्तम धुगवा, होमगार्ड सैनिक पवन आखरे आणि चापोहवा सुरेश आत्राम यांनी तात्काळ चिखलगाव फाटा येथे नाकाबंदी केली.
नाकाबंदी दरम्यान, पांढऱ्या रंगाची महिंद्रा XUV 500 क्रमांक MH-40-BC-0388 संशयितरित्या जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी वाहन थांबवून पंचासमक्ष त्याची तपासणी केली असता, त्यात ६० खोके रॉकेट देशी दारू आढळली. प्रत्येक खोक्यात १०० प्लास्टिकच्या सिलबंद बाटल्या (प्रत्येकी ९० एमएल) भरलेल्या होत्या. या दारूचा एकूण अंदाजे बाजारमूल्य रु. २,१०,०००/- इतका आहे. वाहन चालकाची ओळख पटवली असता, त्याचे नाव शेख अरशद इक्बाल अहमद वय २७ वर्ष, रा. गौतम वार्ड, हिंगणघाट, जि. वर्धा असे आढळले. पोलिसांनी परवान्याबाबत विचारणा केली असता, कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सदर वाहन आणि दारू जप्त करण्यात आली. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे रु. १७,१०,०००/- आहे. या प्रकरणी तळोधी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ००३७/२०२५, कलम ६५(अ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर मानकर करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. संपूर्ण कार्यवाही सपोनि संगीता हेलोंडे, पोलीस उपनिरीक्षक किशोर मानकर, पोहवा रत्नाकर देहारे, मपोअं वैष्णवी लेनगुरे, पोअं उत्तम धुगवा, होमगार्ड सैनिक पवन आखरे आणि चापोहवा सुरेश आत्राम यांच्या पथकाने पार पाडली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.