Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चाहूल उन्हाळ्याची - सौर मोटार पंप बंद अवस्थेत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
solar motor pump in closed state चाहूल उन्हाळ्याची - सौर मोटार पंप बंद अवस्थेत वन्यप्राण्यांना पाणी मिळणे होणार कठीण आमचा विदर्भ - अनंता गोख...
solar motor pump in closed state
चाहूल उन्हाळ्याची - सौर मोटार पंप बंद अवस्थेत
वन्यप्राण्यांना पाणी मिळणे होणार कठीण
आमचा विदर्भ - अनंता गोखरे 
राजुरा (दि. ०७ फेब्रुवारी २०२५) -
        राजुरा वन परिक्षेत्राअंतर्गत (Rajura Forest Zone) येत असलेल्या (Jogapur forest) जोगापूर जंगलातुन प्रवेश द्वारा जवळील सौर ऊर्जेवर चालणारा मोटर पंप (Solar powered motor pump) मागील अनेक महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. याबाबत वनपरिक्षेत्राधिकारी यांना (Wildlife) वन्यजीव प्रेमींनी ईमेल वरून तक्रार, माहिती देऊनही याबाबत काहीही कारवाई करण्यात आली नाही. फेब्रुवारी महिना सुरु होताच आतापासूनच तापमानात वाढ होण्यात सुरुवात झाली आहे. उन्ह्याळ्याची चाहूल लागली तरीही वन्यप्राणांच्या पाण्याकरिता सदर (Motor pump) मोटार पंप सुरु असणे जरुरीचे आहे. 

        प्रत्यक्षदर्शीनी सांगितले कि, एक सौरऊर्जेचे पॅनल गायब झाले आहे. याबाबत माहिती काढली असता मोटर पंप चोरीला गेल्याचे सांगितले जाते आहे. याबाबत पोलिस स्टेशन ला तक्रार दाखल केल्याचे सुद्धा सांगितले जात आहे. शासन सर्वकाही सुविधा पुरवीत असूनही वन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सुविधांचा वापर केला जात नसल्याचे यावरून दिसून येत आहे. उन्हाळ्यातसुद्धा या सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपाचे पाणी सुरू होईल किंवा नाही याबाबत काहीही श्वास्वती नाही. वनविभागाने याची दाखल घ्यावी अशी मागणी वन्यजीवप्रेमी मिलिंद गड्डमवार यांनी केली आहे.

#rajuraforestzone #jogapurforest #solarpoweredmotorpump #Wildlife #motorpump #aamchavidarbha #vidarbha #maharashtra #chandrapur #rajura

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

  1. आपणं योग्य ती दखल घेऊन वृत्त प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद ! असेच सहकार्य अपेक्षित आहे.

    उत्तर द्याहटवा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top