Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा विधानसभा क्षेत्रात 'देवराव पॅटर्न' सुरू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा विधानसभा क्षेत्रात 'देवराव पॅटर्न' सुरू आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा आमचा विदर्भ - दीपक शर्मा...
राजुरा विधानसभा क्षेत्रात 'देवराव पॅटर्न' सुरू
आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
जिवती (दि. ०१ डिसेंबर २०२४) -
        मागील चार महिन्यांपासून प्रलंबित संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभांश आमदार देवराव भोंगळे यांच्या एका फोनने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाल्याने जिवती तालुक्यातील लाभार्थ्यांमध्ये 'देवराव पॅटर्न'ची जोरदार चर्चा रंगली आहे. ('Devarao Pattern' started in Rajura Assembly Constituency)

        जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, विधवा तसेच निराधार असलेल्या ०८ हजार लाभार्थ्यांचे मागील चार महिन्यांपासून लाभांश प्रलंबित असल्याने निराधार लाभार्थ्यांना मोठी आर्थिक चणचण निर्माण झाली होती. त्यामुळे हताश लाभार्थ्यांनी वारंवार तहसील कार्यालयात पायपीट केली. आचारसंहिता आणि अन्य कारणांमुळे लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्याचे सांगण्यात येत असल्याने लाभार्थ्यांच्या पदरी निराशाच पडत होती. (One phone of the MLA and eight thousand deposited in the beneficiary's account)

        राजुरा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे हे जिवती तालुक्याच्या दौऱ्यावर असताना पाटण सितागुडा येथे या प्रश्नांसंदर्भात काही नागरीकांनी त्यांना सुतोवाच केलं, तत्क्षणीच त्यांनी तहसीलदार जिवती यांना थेट भ्रमणध्वनी करून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा प्रलंबित लाभ तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर काही वेळातच लाभार्थ्यांच्या खात्यात सदर लाभ जमा होण्यास सुरुवात झाली. आमदार भोंगळे यांच्या 'फैसला ऑन दी स्पॉट'च्या पॅटर्न'मुळे नागरीकांमध्ये आनंदाचा सुर निर्माण झाला असून क्षेत्राला पहिल्यांदाच दमदार आमदार मिळाल्याची जनसामान्यांत कुजबुज सुरू झाली आहे.

#aamchavidarbha #vidarbha #rajura #chandrapur  #RajuraAssemblyConstituency #MLA #DeoravBhongale #SanjayGandhiDestituteGrantScheme #JivatiTaluka #Decisiononthespot #Labharthi #BJP

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top