Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: लिंक फेलमुळे बँक ग्राहकांना फटका
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लिंक फेलमुळे बँक ग्राहकांना फटका मुख्यद्वारासमोर बाहेर ग्राहक बसतात ताळकळत आमचा विदर्भ - दीपक शर्मा विरुर स्टेशन (दि. ०६ डिसेंबर २०२४) -    ...
लिंक फेलमुळे बँक ग्राहकांना फटका
मुख्यद्वारासमोर बाहेर ग्राहक बसतात ताळकळत
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
विरुर स्टेशन (दि. ०६ डिसेंबर २०२४) -
        येथील बँक ऑफ इंडिया (Bank of India) ची लिंक २ डिसेंबर पासून किमान तिन दिवस बँकेचे व्यवहार ठप्प आहे. विरुर स्टेशन (Wirur Station) सह ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना ग्रामीण भागातील अनेक शेतकरी, वयोवृद्ध, महिला व नागरिकांना आल्यापावली परत जावे लागत आहेत. तेलंगाना व महाराष्ट्र राज्याची सिमा (Telangana and Maharashtra state border) राजुरा तालुक्यातील (Rajura Taluka) विरुर स्टेशन वरुन अगदी १४ किलोमीटर असल्याने येथे पोलीस स्टेशन, रेल्वे स्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र, २२० व ३३  केव्ही विद्युत निर्मिती केंद्र, वनविभाग कार्यालय, तलाठी कार्यालय, ख्रिश्चन मिशनरी चे आशाधाम धर्मादाय हॉस्पिटल, बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बँक, तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ, शाळा महाविद्यालये यासारखे अनेक शासकीय कार्यालय असून १८ ते २० या गावाचा समावेश असतो, येथील बँक ऑफ इंडियाच्या लिंक फेलमुळे २ डिसेंबर पासून आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना आल्यापावली परत जावे लागत आहे. ग्रामीण भागातून अनेक शेतकरी व वयोवृद्ध नागरिकांचे बँक ऑफ इंडियात खाते आहेत. श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेचे पैसे बँकेत जमा होतात. पैसे जमा झाल्याने नागरिकांची पैसे काढण्यासाठी नेहमीच गर्दी असतात मात्र तीन दिवसापासून लिंक फेल आहे. तालुक्यातील विरुर सह केळझर, चिंचाळा, नवेगाव, भेंडाळा, सिरसी, टेंबुरवाही, खांबाळा, सिंधी, नलफळी, धानोरा, कवीटपेठ चिंचोली, अन्नूर अंतरगाव, सुबई, मुंडीगेट, थोमापूर, बापुनगर, डोंगरगाव, आधी गावातून नागरिक बँकेतील व्यवहार, शेती उपयोगी वस्तु खरेदी करण्यासाठी बुधवार हा बाजारपेठेचा मोठा दिवसअसल्यामुळे नागरिकांची व महिलांची प्रचंड गर्दी अससतात. सर्वच बँकांचे व्यवहार ऑनलाइन (online Bank transactions stuck) झाले असल्याने बँक व्यवहार सुरू राहण्यासाठी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे.परंतु व्यवहार ठप्प झाल्यामुळे कर्मचारी सुद्धा  अचंबित झाले असुन वयोवृद्ध नागरिकांना बँकेच्या बाहेरच थांबून प्रतीक्षा करावी लागत आहे. (aamcha vidarbha) याबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला. (Customers sit outside in front of the main hall waiting)

        हैदराबाद राज्य महामार्गाच्या नॅशनल हायवेचे (National Highway) काम सुरु असल्याने (Cable wires are broken) केबलच्या तारा तुटल्या त्यामुळे २ डिसेंबर पासून पूर्णतः बँक ऑफ इंडियाची लिंक फेल (Bank of India link failed) असल्यामुळे व्यवहार पूर्णतः बंद आहे. (Bank link failed)
वैभव हांडेकर
शाखा प्रबंधक, बँक ऑफ इंडिया, विरुर स्टेशन

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top