आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०४ नोव्हेंबर २०२४) -
वनपरिक्षेत्र राजुरा उपक्षेत्र राजुरा नियतक्षेत्र सुमठाणा राखीव वनखंड क्रमांक 154 मध्ये अवैधरित्या रेती उत्खनन होत असल्या बाबत गुप्त माहिती मिळाल्यावरून वन कर्मचारी यांनी सापडा रचून रेती वाहतूक करताना ट्रॅक्टर क्रमांक MH-34 CD-0347 व ट्रॉली क्रमांक MH-34 CD-2203 पकडुन जप्त करण्यात आले व ट्रॅक्टर मालक अविनाश बापूजी टोंगे रा. राजुरा व इतर आरोपी विरुद्ध वन गुन्हा नोंदविण्यात आला. सदरची कार्यवाही राजुराचे उपविभागीय वन अधिकारी जोंग साहेब (आयएफएस) यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी एस.डी. येलकेवाड यांच्या नेतृत्वात वनक्षेत्र सहाय्यक एस.एम. संगमवार, नियत वनरक्षक एस. आय. तोडासे, एस.व्ही. गजलवार, पी.ए. मंदुलवार, पी.ड्ब्लू. देशमुख व रोजंदारी मजदुरांनी केली. पुढील कारवाई वन विभागातर्फे करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.