गडचांदूर (दि. ३१ ऑकटोबर २०२४) -
कोरपना तालुक्यात संभाजी ब्रिगेडमध्ये युवक, पुरुष व महिलांचे इनकमिंग सुरू झाले असून सामाजिक कार्यकर्ते भूषण मधुकरराव फुसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गडचांदूरात शेकडो युवक, पुरुष व महिलांचा संभाजी ब्रिगेड पक्षा मध्ये प्रवेश केला. विशेष बाब म्हणजे शिवश्री भूषण मधुकरराव फुसे यांनी दुपट्टा टाकत सर्वांचे स्वागत केले. कोरपना तालुक्यातील चेन्नई खुर्द येथील मनसे उपाध्यक्ष दशरथ गेडाम, जांभुळदरा येथील कोरपना तालुका सोसायटी अध्यक्ष चंदुलाल शेडमाके यांनी सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्ष प्रवेश केला.
गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्र पिंजून काढत जनसंपर्क वाढविला आहे. डिस्को डांस, लावणी, डिस्को दांडिया, ठुमका, झुमका, नट्या, पार्ट्या अश्या कार्यक्रमांना बगल देत भूषण फुसे यांनी सामाजिक चळवळीतून प्रा. लक्ष्मण यादव. प्रा. वसंत हंकारे, भक्तिमय माता जगराता, कोणतीही गाजावाजा न करता गरजवंतांना वेळोवेळी सहाय्य्य, गोर, गरीब कष्टाळू लोकांचे कामे न करणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांना तंबी, वेळप्रसंगी दे दणका अश्या कामांना बघत शोषित-वंचित लोकांचा मोठा वर्ग भूषण फुसे यांच्या कडे आकृष्टल्या जात आहे. त्याचीच हि परिणीती असून गडचांदूरात शेकडो युवक, पुरुष व महिलांचा संभाजी ब्रिगेड पक्षा मध्ये प्रवेश घेतला.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #Congrass #SwatantraBharatPaksha #VanchitBahujanAaghadi #BJP #AamAadamiParty #AssemblyElections2024 #MaharashtraAssemblyGeneralElection2024 #ChandrapurDist #sambhajibriged
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.