मनोरंजन आणि नवचेतनेचा उत्सव आहे घुसाडी महोत्सव
राजुरा (दि. ०४ नोव्हेंबर २०२४) -
गोंड समाजामध्ये मशागतीच्या व्यस्त कामामुळे आलेल्या थकव्यातून नवी जाणीव करून घेण्याकरिता घुसाडी महोत्सवाचे आयोजन केले जाते. घुसाडी महोत्सवाच्या माध्यमातून व्यस्त लोकांना घर, कौटुंबिक कार्यक्रमांसाठी आणि मनोरंजनासाठी वेळ मिळतो. देवारी गोंड समाजाचे नृत्य देवता येत्मासूर, देवारपेदेर यांच्या नावावरून या उत्सवाचे नाव पडले आहे. या प्रसंगी, या नृत्यांची प्रमुख देवता, येत्मासूर पेनची पूजा केली जाते. दंडारी, घुसडी, हुलकी, कर्मा इत्यादी नृत्य समूह एका गावातून दुसऱ्या गावात जाऊन नृत्यकलेचे प्रदर्शन करतात. रात्री दिवे लावून नृत्याच्या कार्यक्रम होतो. या कार्यक्रमात मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित असतात. या प्रसंगी आदिवासी आणि गोंड समाजातील लोक त्यांच्या देवतांची पूजा करतात आणि मनोरंजनासाठी दंडारी, घुसडी, हुलकी, कर्म इत्यादी उत्सव आयोजित करतात.
आदिवासी आणि गोंड समाजातील एक मोठा वर्ग समाजसेवक भूषण फुसे यांना आपला सहानुभूतीदार मानतो. आदिवासी आणि गोंड समाजातील मोठ्या वर्गाच्या विनंतीवरून राजुरा विधानसभा क्षेत्र संभाजी ब्रिगेडचे उमेदवार व सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी घुसाडी महोत्सवाला उपस्थिती दर्शवून निवडणूक प्रचाराचा शंखनाद केला आहे. याप्रसंगी आदिवासी व गोंड समाजाच्या लोकांनी सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांना विजय भवाचे आशीर्वाद दिले. राजुरा विधानसभा मतदारसंघातील प्रस्थापित नेते भोळ्याभाबड्या आदिवासी आणि गोंड समाजाच्या लोकांना ‘झाकोला’ देत आले आहेत. या नेत्यांचे नातेवाईक, भाऊ, बंधू, दलाल कार्यकर्ते सत्ता मिळताच काही आदिवासींच्या नावे आदिवासींच्या जमिनी खरेदी करून, त्यावर भूखंड टाकून आदिवासींच्या माध्यमातून ते भूखंड विकून करोडोंची कमाई करत आहेत. हे काम प्रस्थापित नेत्यांच्या दलाल कार्यकर्त्यांकडून वर्षानुवर्षे सुरू आहे. आजपर्यंत आदिवासी आणि गोंड समाजाच्या ह्या वेदना समजून घेणारा खंबीर नेता लोकांना मिळालेला नाही. मात्र सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या ''देबत्ती'' धोरणामुळे लोकांमध्ये एक नवी चेतना जागृत झाली असून हा व्यक्ती महिला, पुरुष, शेतकरी, शेतमजूर, असंघटित क्षेत्रातील मजूर, शोषित, पिडीत, प्रकल्पग्रस्त आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देईल, असा विश्वास जागृत झाला आहे. कारण यापूर्वी भूषण फुसे यांनी शेकडो आदिवासी समाजातील लोकांचे काम करवून दिले आहे. त्यामुळे भूषण फुसे यांच्या मागे आदिवासी, गोंड व इतर समाजाचा मोठा जनसागर दिसून येत आहे.
#MaharashtraAssemblyElection2024 #GhusadiMahotsav #Shankhnad #Navchetna #Aadiwasi #Gond #Samuday #Nrutyakala #SocialWorker #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #SambhajiBrigedPaksha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.