Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ऑल इंडिया पँथर सेनेचे सुद्धा मिळाले समर्थन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा विधानसभा क्षेत्रात सुरुंग लावतोय ''संभाजी''चा छावा रणनीती : काही शिवसैनिकही ''गनिमी कावा'' कार्याने उ...
राजुरा विधानसभा क्षेत्रात सुरुंग लावतोय ''संभाजी''चा छावा
रणनीती : काही शिवसैनिकही ''गनिमी कावा'' कार्याने उत्साहित
@राजुरा विधानसभा क्षेत्र ७०
राजुरा (दि. ०८ नोव्हेंबर २०२४) -
राजुरा विधानसभा क्षेत्रात सामाजिक चळवळीतून नागरिकांच्या मनात आपले वेगळे स्थान बनविणारे संभाजी ब्रिगेडचे उमदेवार व सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी त्यांच्या कार्याने वेगळाच ठसा उमटविला असून त्यांच्या याच व्यक्तिमत्वामुळे निवडणुकीत त्यांना विविध सामाजिक संघटना व कामगार संघटनेचे समर्थन मिळत आहे. रोखठोक प्रहार कामगार संघटना, सुरज ठाकरे यांची जय भवानी कामगार संघटना व आता ऑल इंडिया पँथर सेनेने सुद्धा संभाजी ब्रिगेडचे उमदेवार व सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे याना समर्थन दिले आहे. ऑल इंडिया पँथर सेनेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, गोंडपिपरी, जिवती, कोरपना या चारही तालुक्यात आहेत. ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकर यांनी समर्थन पत्र दिले आहे.

मध्यन्तरीच्या काळात सामाजिक कार्यकर्ता भूषण यांनी असंगठित क्षेत्रातील कामगारांकरिता मोठे आंदोलने केली आहेत. सिमेंट उद्योद असोत, कोळसा खाणी असोत, कोल वॉशरीज असोत, बांधकाम क्षेत्रातील मजूर वर्ग असोत त्यांनी असंगठित क्षेत्रातील कामगारांकरिता आवाज उठविला आहे. वेळप्रसंगी त्यांच्या ''दे दणका'' नीतीने असंगठित क्षेत्रातील कामगारवर्गात ते लोकप्रिय झाले आहेत. कामगारा व्यतिरिक्त शेतकरी, शेतमजूर असो वा महिला व मुली असोत त्यांच्या हक्कासाठी ते नेहमी लढा देत आहेत. काही शिवसैनिकही ''गनिमी कावा'' कार्याने उत्साहित दिसून येत असून ''संभाजीच्या छाव्याला मदत नाही करणार तर कुणाला करणार'' म्हणत आतून समर्थन करीत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक व अनेक दिव्यांग बंधू भगिनींचे पहिले मत या नव्या चेहऱ्याला झाले आहे. तळागाळातील सर्वसामान्य लोकांप्रति त्यांचे समर्पण बघता त्यांना विविध सामाजिक संघटना, कामगार संघटनेचे समर्थन मिळत असल्याने प्रस्थापित नेत्यांची धास्ती वाढली आहे.
#MaharashtraAssemblyElection2024 #GhusadiMahotsav #Shankhnad #Navchetna #Aadiwasi #Gond #Samuday #Nrutyakala #SocialWorker #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #SambhajiBrigedPaksha #Congress #BJP #ShetkariSanghtna #RokhthokPraharKamgarSanghtna #Mahila #Muli #Atyachar #VidarbhaNavnirmanParty #JayBhavaniKamgarSanghtna #SurajThackeray #parcel #RokhthokPraharKamgarSanghtna #Mahila #Muli #Atyachar #AllIndiaPantherSena #sambhajichachava #Ganimikava

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top