Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भेंडाळा येथे गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी गुुणवत्ता सिध्द केली - ॲड. वामनराव चटप आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. 26 मे 2024) -         ग्रामीण भ...

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी गुुणवत्ता सिध्द केली - ॲड. वामनराव चटप
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 26 मे 2024) -
        ग्रामीण भागातील शाळा चांगले शैक्षणिक कार्य करीत असून या गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांनी आपण कुठेच मागे नसल्याचे स्वकर्तृत्वातून सिध्द केले आहे. यापुढेही ही शैक्षणिक प्रगती कायम राहून उच्च शिक्षणातही आपली अशीच प्रगती कायम ठेवतील. स्पर्धेच्या युगात ग्रामीण विद्यार्थ्यांनी हे आव्हान स्विकारून ते यशस्वी झाल्याबद्दल शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप शुभेच्छा देत या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
        राजुरा तालुक्यातील भेंडाळा येथील इयत्ता बारावीच्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी घरी जाऊन सत्कार केला. इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, विरूर स्टेशन येथील इयत्ता बारावीतील कु. सानिका संजय ढवस, कु. साक्षी प्रभाकर ढवस व कु. दिक्षा संतोष निकोडे या गुणवत्ताप्राप्त विद्यार्थीनींचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार केला. यावेळी ॲड.वामनराव चटप यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
        याप्रसंगी राजुरा बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक प्रभाकर ढवस, पं.स. माजी उपसभापती आबाजी ढवस, उपसरपंच दिनेश वसाके, मधुकर चिंचोलकर, केतन जुनघरे, बापुजी ढवस, नामदेव ढवस, सागर ढवस, समिर ढवस, कल्पना ढवस, लीला ढवस, शीतल लेडांगे, सुनिता ढवस, यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

#news #breakingnews #aamchavidarbha #vidarbha #maharashtra 
#chandrapur #rajura #bhendala #advwamanraochatap #student

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top