Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. 2 मे 2024) -         दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर आवारातील गेट जवळ एक ...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 2 मे 2024) -
        दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर आवारातील गेट जवळ एक अनोळखी इसम झोपलेल्या स्थितीत दिसल्याने त्यास वॉर्डबॉयने उठवून पाहिले असता तो हालचाल करीत नव्हता. त्यामुळे सदर इसमास जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथील अपघात विभागात भर्ती केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिस स्टेशन येथे नोंद करण्यात आली असून सदर मृतक हा अनोळखी असून त्याची अजुनपर्यंत ओळख पटलेली नाही व त्याचे कोणीही नातेवाईक समोर आलेले नाही. मृतकाची ओळख पटविण्याकरीता नातेवाईकांचा शोध घेतला असता ते सुध्दा मिळू शकले नाही, त्यामुळे सदर अनोळखी मृतकाची ओळख पटविण्यासाठी संबंधितांनी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

       मृतकाचे वर्णन : अनोळखी इसम वय अंदाजे 65 वर्ष, रंग काळा सावळा, चेहरा-लांबट, डोक्याचे केस बारीक पांढरे, दाढी मिशीचे केस पांढरे, उजव्या हाताला पंजापासून खांदयापंर्यंत दवाखान्याचे बॅंडेज बांधलेला, अंगात तपकिरी काळया लाईन असलेला मळकट फुल शर्ट, सिमेंट रंगाचा फुलपॅन्ट घातलेला अनोळखी पुरुष इसम.

#aamchavidarbha
#vidarbha
#policestationchandrapur
#districtgeneralhospitalchandrapur

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top