Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: काँग्रेसचे राजुऱ्यात प्रचार कार्यालयाचे उद्घाटन व जाहीर सभा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (दि. १० एप्रिल २०२४) -         चंद्रपूर - १३ लोकसभा मतदार संघाच्या इंडिया तथा महाविकास आघाडीच्या उमेदवार श्...

आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. १० एप्रिल २०२४) -
        चंद्रपूर - १३ लोकसभा मतदार संघाच्या इंडिया तथा महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती प्रतिभा सुरेश धानोरकर यांच्या प्रचारार्थ राजुरा येथे चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीराम मंदिर लगत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, शहरातून मिरवणूक आणि गांधी चौक येथे जाहीर सभा पार पडली.

        यावेळी अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे होते. ते म्हणाले की, वाढती महागाई, बेरोजगारी, सिंचन सुविधा, शिक्षण, आरोग्य, राष्ट्रीय सुरक्षा, शेतमालांचे कोसळलेले भाव, प्रकल्पग्रस्त, नुकसानग्रस्तांची होणारी पिळवणूक, सुरक्षा अशा विविध मुद्दय़ांवर सरकार कुचकामी ठरल्याने जनतेला देशात बदल हवा आहे. 

       या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, स्वामी येरोलवार, अँड. सदानंद लांडे, अँड. अरूण धोटे, अशोकराव देशपांडे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, अल्पसंख्याक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सय्यद सकावत अली, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, आदिवासी नेते श्यामराव पाटील कोटणाके, कामगार नेते शंकर दास, महिला काँ. शहराध्यक्षा संध्या चांदेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सरिता कुडे, उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे, नितीन पिपरे, तालुकाध्यक्ष संदीप वैरागडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आशिफ सय्यद, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिनेश पारखी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (vidarbha) (aamcha vidarbha) (chandrapur-vani-aarni loksabha nivadnuk)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top