Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा येथे होमियोपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमॅन यांची जयंती साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (दि. १० एप्रिल २०२४) -         राजुरा मेडिकल होमियोपॅथीक मेडिकल असोसिएशन कडून होमियोपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल...

आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. १० एप्रिल २०२४) -
        राजुरा मेडिकल होमियोपॅथीक मेडिकल असोसिएशन कडून होमियोपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमॅन यांची जयंती व जागतिक होमीयोपॅथीक दिन १० एप्रिल ला सकाळी डॉ. हॅनिमॅन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून डॉ. कुइटे यांचे मारोती क्लिनिक येथे साजरा करण्यात आला. (Father of Homeopathy Dr. Samuel Hahnemann) कार्यक्रमाचे अध्यक्ष दंतरोग चिकित्सक डॉ. गणेश गेडाम, आयोजक डॉ. चंद्रकांत कुइटे, प्रमुख उपस्थिती डॉ. चंद्रशेखर गोवारदीपे तसेच होमीयोपॅथीक असोसिएशनचे इतर पदाधिकारी डॉ. नाथ बोबडे, डॉ. पराग डोर्लीकर, डॉ. रामटेके, डॉ. सौ. प्रियंका डुकरे, डॉ. जिड्डेवार, डॉ. गोरे, डॉ. अमोघ कल्लुलवार, डॉ. कुणाल गोवारदीपे, डॉ. चिंदमवार इत्यादी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. कुइटे यांनी तर डॉ. डोर्लीकर यांनी डॉ. हॅनिमॅन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच डॉ. सौ. प्रियंका डुकरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता डॉ. गोवारदीपे यांनी मार्गदर्शन केले. (vidarbha) (aamcha vidarbha) (rajura)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top