आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०४ मार्च २०२४) -
गावातील जुन्या मित्रांनी एकत्र येऊन सकारात्मक विचारांची पेरणी केली, हे अंत्यंत कौतुकास्पद आहे. आपण सर्व गावात आल्याने जीवनाच्या प्रवासात जे मागे राहिले असतील, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाल्यास निश्चितच परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली जाऊ शकते. गावातील व बाहेरगावी गेलेले यांचे नव्याने निर्माण झालेले परस्पर संबंध एक नवा इतिहास रचतील आणि हिच आत्मियता परिवर्तनाची नांदी ठरेल, असे प्रतिपादन चंद्रपूर सहकार प्रशिक्षण केंद्राचे माजी प्राचार्य नानासाहेब बारहाते यांनी केले.
हिंगणघाट तालुक्यातील रोहणखेडा या गावातील बाहेरगावी नौकरी अथवा व्यवसायानिमीत्त गेलेल्या नागरिकांचा स्नेहमिलन सोहळा रोहणखेडा येथे आयोजित करण्यात आला. यावेळी सोहळ्याचे उद्घाटक म्हणून नानासाहेब बारहाते बोलत होते. या सोहळ्याला मोठ्या संख्येने बालपणातील सवंगडी आपल्या परिवारासह एकत्र आले आणि आपल्या अनेक आठवणी, जीवनात केलेला संघर्ष व त्यावर मात करून केलेला प्रवास याविषयी मन मोकळे केले. कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक व प्राध्यापक यांचा सत्कार करण्यात आला. अंत्यंत भावपूर्ण झालेल्या या सोहळ्यात गावातील नागरिक सहर्ष सहभागी झाले.
या स्नेहमिलन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप गोडे होते. प्रमुख अतिथी दत्तात्रय फरताडे, सरपंंच दिलीप बारहाते, गणेश फरताडे, प्रा.डाॅ.विनय बारहाते, अजय बाळसराफ, संदीप फरताडे, हिरामन वागदे, लक्ष्मण महल्ले, प्रभाकर येंगडे, नंदकिशोर बाळसराफ, डाॅ.सुलभा बारहाते आदी मान्यवर उपस्थित होते. सोहळ्याचे उद्घाटन दिप प्रज्वलन व महापुरूषांच्या प्रतिमेला हारार्पण करून झाली.
सोहळ्याचे अध्यक्ष दिलीप गोडे यांनी चाळीस वर्षापूर्वीच्या अनेक आठवणी सांगत सा-यांचेच लक्ष वेधून घेतले. जगात सर्वच क्षेत्रात प्रगती झाली असून आपल्या गावातही काही बदल झाला आहे. रोहणखेडा हे पुर्वी शैक्षणिकदृष्ट्या अंत्यंत प्रगत होते. त्यामुळे येथील अनेकांनी उच्च शिक्षण घेऊन बाहेरगावी आपले कर्तुत्व सिध्द केले. हीच परंपरा कायम ठेऊन आता भावी पिढीने आपल्या प्रयत्नाने यशाच्या शिखरावर गावाला घेऊन जावे आणि या एकविसाव्या शतकात गावाने विकासाच्या दृष्टीने कात टाकुन आदर्श निर्माण करावा, असे दिलीप गोडे यांनी व्यक्त केले. यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य नानासाहेब बारहाते, सेवानिवृत्त प्राध्यापक डाॅ.सुलभा बारहाते, जेष्ठ नागरिक दत्तात्रय फरताडे, हिरामन वागदे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश फरताडे, संचालन अनिल बाळसराफ व आभार प्रदर्शन महादेव नराते यांनी केले. कार्यक्रमाला किशोर फरताडे, अविनाश बारहाते, संंजय फरताडे, मुरलीधर वडेकार, गोवर्धन कुबडे, ॲड.रेखा बारहाते, वैशाली फरताडे, रेखा फरताडे, संध्या बाळसराफ, गुंफा फरताडे, जयश्री बाळसराफ, मेघा बाळसराफ, सुचंद्र वागदे, उमाकांत येंगडे, राजेश फरताडे, अनिल फरताडे, नाना कांबळे, सतिश बाळसराफ, जनार्धन पाटील, रामदास चौधरी, गजानन खाटे, धनंजय फरताडे, वामन राजुरकर, मधुकर कांबळे, नारायण आत्राम, चोखा नगराळे, विजय गोडे, चंद्रकांत येंगडे, विकास ढाले, गजानन डहाके, रमेश खुरपुडे, गजानन बाळसराफ, महादेव हजारे, प्रविण गुजरकर, रमेश फरताडे, आदिनाथ फरताडे, सागर सालेकार, ज्योतीबा थुल, सुरेश फरताडे, प्रमोद फरताडे यांचेसह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. (aamacha vidarbha) (rohankheda)
Advertisement

Related Posts
- कढोली बुज गाव हादरलं; ३० वर्षीय तरुणाची नदीत उडी29 Jul 20250
कढोली बुज गाव हादरलं; ३० वर्षीय तरुणाची नदीत उडीपोलीस आणि गावकऱ्यांची संयुक्त शोधमोहीम सुरूच!राजुरा ...Read more »
- आदिवासी मंत्र्यावर अवमानकारक भाष्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी28 Jul 20250
आदिवासी मंत्र्यावर अवमानकारक भाष्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीआमचा विदर्भ - दीपक शर्माराजु...Read more »
- "राजुरा न.प. शिक्षण परिषदेला यशाचा सन्मान!"26 Jul 20250
"राजुरा न.प. शिक्षण परिषदेला यशाचा सन्मान!"विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाचा आदर्श उपक्रमआमचा विदर्भ - दी...Read more »
- "आदिवासी तरुणाचा प्रण: यश न मिळेपर्यंत दाढी-केस नाही कापणार!"26 Jul 20250
"आदिवासी तरुणाचा प्रण: यश न मिळेपर्यंत दाढी-केस नाही कापणार!"सात वर्षांचा प्रण पूर्ण करणारा ''सूरज''...Read more »
- भेंडाळा-चिचबोडी रस्त्यावरील पूल वाहून गेला, नागरिकांचा संताप25 Jul 20250
भेंडाळा-चिचबोडी रस्त्यावरील पूल वाहून गेला, नागरिकांचा संतापआमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (...Read more »
- संततधार पावसाने रस्त्यावरच पूर, नागरिक घरात कैद24 Jul 20250
संततधार पावसाने रस्त्यावरच पूर, नागरिक घरात कैदघरे-रस्ते जलमय, जनजीवन विस्कळीततुकूम-शास्त्रीनगर जलमय...Read more »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.
EmoticonClick to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.