Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सास्तीत जागतिक महिला दिन साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (दि. १५ मार्च २०२४) -         जागतिक महिला दिनानिमित्त सास्ती वार्ड नं. 2 येथे महिलांनी 8 मार्च जागतिक महिल...

आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. १५ मार्च २०२४) -
        जागतिक महिला दिनानिमित्त सास्ती वार्ड नं. 2 येथे महिलांनी 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ. सुचिता अश्विन माऊलीकर यांना आमंत्रित करण्यात आले. तसेच सौ. मंदाताई रमेश पेटकर व या महिला मंडळांच्या अध्यक्षा सौ. सरिताताई अनिल बोनगिरवार होते. या कार्यक्रमाचे सुरुवात सावित्रीबाई फुले व जिजाबाई यांच्या फोटोला वंदन करून दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. करुणा घटे व नेहा खनके यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत गीत सौ. रजनी भटारकर, रोशनी भटारकर, रश्मी बोनगिरवार व संध्या भटारकर यांनी मिळून म्हटले. तसेच सुचिता माऊलीकर यांचे स्वागत महिला अध्यक्षा सरिता बोनगिरवार यांनी श्रीफळ शाल देऊन सत्कार केले. तसेच या कार्यक्रमाचे सचिव रजनीताई भटारकर पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. मंदाताई पेटकर यांचे स्वागत उपाध्यक्षा सौ. नंदाताई घटे यांनी श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले. आणि महिला अध्यक्षा सरिता बोनगिरवार यांचे स्वागत सौ. शीलाताई चन्ने व वैशाली मडावी श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले. या कार्यक्रमाचे जेष्ठ नागरिकांचे स्वागत सौ. रोशनी भटारकर, पोर्णिमा भटारकर, वैशाली भटारकर, लता आसुटकर, रेखा माथनकर यांनी श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.

                सुचिता माऊलीकर यांनी महिला विषयी अनेक महिती दिली व काही योजना समजावून सांगितले. महिलांनी सक्षम व्हावे आपल्या गावाची प्रगती करावे. असे त्यांनी भाषणाव्दारे आपले मनोगत व्यक्त केले. त्यात सर्व महिलांनी भाषणाव्दारे आपले मनोगत व्यक्त केले. महिलांनी पुष्पगुच्छ देऊन एकमेकांचे स्वागत केले.या कार्यक्रमात अनेक महिलांनी उपस्थित राहुन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाचे आभार प्रगटन सौ. पोणिऀमा भटारकर व रश्मी बोनगिरवार यांनी केले. या कार्यक्रमात जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांची, मुलींचा समावेश होता. सुशिला बेले, गिरिजा बेले, निर्मला बेले, गया आसुटकर, ताराबाई भटारकर, रेखा मानकर, रमलताई बोनगिरवार, तसेच महिला सदस्य सौ. मेघा पुरटकर, सुनिता चोखारे, रजनी चन्ने, वृषाली खनके, पोर्णिमा वाडके, लता आसुटकर, संध्या भटारकर, मनिषा बेले, अश्विनी पेटकर, सोनल पेटकर, सुनिता लेक्कलवार, वर्षा जानवे, गीताताई चन्ने, शकुंतला खनके, पुष्पाताई खनके या सर्व माहिला उपस्थित होत्या. (aamcha vidarbha) (rajura) (sasti)


Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top