Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अँड. वामनराव चटप यांनी लोकसभा लढवावी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शेतकरी युवा विदर्भवादी जनमताचा सुर सोशल मीडियावर रंगतेय मोठी चर्चा आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. १६ मार्च २०२४) -         राजकारणात...

शेतकरी युवा विदर्भवादी जनमताचा सुर
सोशल मीडियावर रंगतेय मोठी चर्चा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १६ मार्च २०२४) -
        राजकारणातील एक प्रामाणिक होतकरू शेतकरी विदर्भवादी लोकप्रिय झुंजार नेतृत्व म्हणून ॲड.वामनराव चटप माजी आमदार (former MLA Adv. Vamanrao Chatap) राजुरा विधानसभा क्षेत्र यांची ओळख सर्वत्र आहे. यापूर्वी दोनदा लोकसभा निवडणूक लढवून मोठे मताधिक्य चटपांनी घेतले. पराभवानंतरही लोकांशी सतत संपर्क आणि शेतकरी व वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी करीत असलेले विवीध आंदोलन ही ॲड. चटप यांची जमेची बाजू आहे. गेल्या अनेक वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्न भारताच्या सर्वोच्च सभागृहात अजूनही दिसुन येत नसून शेतकऱ्यांचे प्रश्न कायम आहे. सोबतच स्वतंत्र विदर्भ राज्य विकासाचे राज्य अशी संकल्पना घेऊन 2010 पासून प्रमाणिकपणे वेगळ्या विदर्भाची लढाई ॲड.वामनराव चटप यांच्या नेतृत्वात विदर्भ राज्य आंदोलन समिती शेतकरी संघटना आणि विविध संघटना लढत आहे. यापूर्वी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता लोकसभेसाठी भाजपाने उमेदवारी दिलेले चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी नागपूर ते खामगाव यात्रा करून वेगळ्या विदर्भाची मागणी केली. मात्र सत्ता येतात सदर मागणीचा विसर पडून त्यांनी या मागणीला पूर्णपणे विराम दिला. त्यामुळे वैदर्भीय जनतेचा मोठा भ्रम निरास झाला आहे. कोणताच विदर्भातील खासदार संसदेमध्ये वेगळ्या विदर्भाची भुमिका मांडत नसल्यामुळे विदर्भीय जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येते. याउलट विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधीही वेगळ्या विदर्भाच्या व शेतकऱ्यांच्या भूमिकेबाबत सक्रिय दिसत नाही. शेतकऱ्यांच्या विरोधातल्या अनेक जाचक अटी सोबतच वेगळ्या विदर्भाचा प्रश्न संसदेत मांडणे अत्यंत गरजेचे आहे त्याशिवाय शेतकऱ्यांचे व सामान्य जनतेचे प्रश्न सुटू शकणार नाही ही भूमिका ॲड. वामनराव चटप यांचे शिवाय कोणीच मांडू शकत नाही अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आता दिसून येत आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भाची हक्काची लढाई लढणारा शेतकऱ्यांचा नेता अशी ओळख असलेल्या ॲड. चटपांनी लोकसभा निवडणूक लढवावी असे जनमत सर्वच तालुक्यांमध्ये दिसून येत आहे. चंद्रपूर आणि लोकसभा क्षेत्रात चंद्रपूर राजुरा बल्लारशा वरोरा वणी आर्णी या विधानसभा क्षेत्रातील लोकमत चटपाच्या पाठीशी राहू शकते असा आशावाद कार्यकर्ते करताना दिसत आहे. तिसरा पर्याय म्हणून ॲड.वामनराव चटप हे चांगला पर्याय ठरू शकतात त्यांच्या उमेदवारीने मोठ्या राष्ट्रीय पक्षांना घाम सुटणार हे मात्र निश्चित. लोकांच्या या जनमता बाबत ॲड.वामनराव चटप काय भूमिका घेतात यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (aamcha vidarbha) (chandrapur) (rajura)



Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top